sunetra pawar  Saam tv
महाराष्ट्र

Baramati bypoll : सुनेत्रा पवारांविरोधात १९ उमेदवार मैदानात, संपूर्ण यादी समोर, वाचा कोण-कोण रिंगणात?

Baramati by-election 2026 candidates : बारामती पोटनिवडणुकीत आतापर्यंत १९ उमेदवारांनी अर्ज दाखल केला असून सुनेत्रा पवार यांच्यासमोर बहुकोनी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे. अपक्ष आणि विविध पक्षांचे उमेदवार रिंगणात.

Namdeo Kumbhar

Baramati Bypoll Election 2026 Candidates List : राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीने आता वेगळेच वळण घेतले आहे. ही निवडणूक 'बिनविरोध' करण्यासाठी सत्ताधारी भाजपने सुरुवातीला प्रयत्न केले असले, तरी आता प्रत्यक्ष मैदानात मात्र सुनेत्रा पवार यांच्यासमोर अपक्ष आणि इतर पक्षांच्या उमेदवारांचा मोठा फौजफाटा उभा राहताना दिसत आहे. अधिकृत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असतानाच आतापर्यंत १९ जणांनी आपले नामांकन दाखल केले आहेत.

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनीही या निवडणुकीत उतरण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांनी अद्याप आपली राजकीय भूमिका (अपक्ष की पक्षीय) स्पष्ट केली नसली, तरी त्यांच्या उमेदवारीमुळे मतांच्या गणितात मोठी उलथापालथ होऊ शकते. महाविकास आघाडीतील महत्त्वाचा घटक असलेल्या काँग्रेसकडूनही उमेदवार दिला जाण्याची दाट शक्यता आहे. तसे झाल्यास ही लढत तिरंगी किंवा चौरंगी स्वरूप धारण करेल. सुनेत्रा पवार ६ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरतील.

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत कुणी कुणी केला अर्ज? संपूर्ण यादी

सतिश कदम ( हिंदुस्तान जनता पार्टी )

सागर भिसे ( अपक्ष )

अभिजीत बिचुकले ( अपक्ष )

राघू घटुकडे ( न्यू राष्ट्रीय समाज पार्टी )

गजानन गवळी ( अपक्ष )

त्रिशाला कांबळे ( अपक्ष )

दिलीप अळोणी ( अपक्ष )

दत्तात्रेय बेदरे ( अपक्ष )

अरूण निटुरे ( राष्ट्रीय किसान बहूजन पार्टी )

सागर भिसे ( अपक्ष )

रजाक मुलाणी ( अपक्ष )

संदीप खरात ( अपक्ष )

विलास होळकर ( अपक्ष, बारामती )

दादा थोरात ( अपक्ष, बारामती )

अभिजीत कांबळे ( अपक्ष, बारामती )

मिथून आटोळे ( अपक्ष, बारामती )

अभिजीत बिचुकले ( अपक्ष )

अनिल तुपे ( अपक्ष )

संकेत गावडे ( अपक्ष, बारामती )

निवडणूक प्रचाराच्या जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण आवश्यक- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती (मीडिया सर्टीफीकेशन अॅण्ड मॉनिटरिंग कमिटी) गठित करण्यात आली आहे. बारामती विधानसभा पोट निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक प्रचाराच्या जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण या समितीकडून करुन घेणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच समितीचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी कळविले आहे. उमेदवारांमार्फत प्रचारासाठी इलेक्ट्रॉनिक, समाज माध्यमे (सोशल मीडिया) तसेच फिरत्या एलईडी व्हॅन, ऑटो रिक्षा आदी बाह्यमाध्यमांवरून देण्यात येणाऱ्या श्राव्य (ऑडिओ), दृकश्राव्य (ऑडिओ-व्हीज्युअल) जाहिरांतीचे पूर्व प्रमाणीकरण या समितीमार्फत केले जाते. तर मुद्रीत माध्यमात (प्रिंट मीडिया) मतदानाच्या दिवशी किंवा मतदानाच्या एक दिवस अगोदर प्रकाशित करावयाच्या जाहिराती समितीकडून पूर्व प्रमाणीकरण करून घेणे बंधनकारक आहे. माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समितीचे कामकाज जिल्हा माहिती कार्यालय, नवीन मध्यवर्ती इमारत, तळमजला, ससून रुग्णालयासमोर, पुणे- ४११००१ येथून चालणार असून दूरध्वनी क्रमांक ०२०-२६१२१३०७ असा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बारामती पोट निवडणूक बिनविरोध होण्यासाठी गरज पडल्यास राहुल गांधींची भेट घेणार - सुनील तटकरे

Navi Mumbai: दारूसाठी एकमेकांच्या जीवावर उठले, लाथाबुक्क्या अन् काठीने बेदम मारहाण; VIDEO व्हायरल

खासगी आणि सरकारी कार्यालयांना आठवड्यातून २ दिवस सुट्टी; इंधन तुटवड्यादरम्यान सरकारचा मोठा निर्णय

Nakshatra Gochar: मंगळ आणि शुक्राच्या गोचरमुळे बदलणार ४ राशींचे भाग्य; घरात येणार धन-दौलत अन् सूख-समृद्धी

Matka Water: उन्हाळ्यात माठातलं पाणी पिताय? चुकीच्या पद्धतीमुळे पडाल आजारी, लक्षात ठेवा ही १ गोष्ट

SCROLL FOR NEXT