बारामती पोटनिवडणुकीत सहा उमेदवारांची माघार
एकूण उमेदवारांची संख्या ५३ वरून ४७ वर
निवडणूक जवळ येताच राजकीय घडामोडींना वेग
राज्यातील विधानसभा निवडणुकांपेक्षा बारामती आणि राहुरी पोटनिवडणुका चर्चेत आहेत. अख्या राज्याचे लक्ष या निवडणुकांकडे लागले आहे. जसजसं निवडणुका जवळ येत आहेत, तसतशा नवनवीन घडामोड होत आहेत. पोटनिवडणुकीत एकूण ५३ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते त्यापैकी सहा जणांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. आता अर्जाची संख्या 47 राहिली आहे.
बारामती पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असा विनंती महायुतीनं विरोधकांकडे केली होती. सुनेत्रा पवार यांनीही उद्धव ठाकरेंसह अनेकांना फोन करून पाठिंबा मागितला होता. त्यामुळे बारामती निवडणूक बिनविरोध होणार असं वाटत होतं, मात्र ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे. सुरुवातीला एकूण ५३ उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केला होता, मात्र आता सहा जणांनी आपला अर्ज मागे घेतला आहे.
अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये विलास होळकर ,माऊली कांबळे, रजाक मुलाणी,राहुल थोरात, अमोल कोकरे ,अशोक खामगळ यांचा समावेश आहे. उद्या गुरुवार 9 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. उद्या अजून किती जण आपला उमेदवारी अर्ज मागे घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार का याचा निर्णय उद्या उमेदवारी अर्ज किती राहतात त्यावर अवलंबून आहे. त्यामुळे बारामतीत उद्या मोठ्या राजकीय घडामोडी घडू शकतात.
दरम्यान भाजप सुनेत्रा पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीसांची यांनी दिलीय. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती मतदारसंघात पोटनिवडणूक पार पडत आहे. त्यासाठी सुनेत्रा पवार यांना बिनविरोध निवडून देण्यासाठी सर्वपक्षीयांकडून प्रयत्न सुरू आहेत. पण काँग्रेसने उमेदवारी अर्ज भरला आहे. यावरून भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे.
दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघातून आज 4 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे 18 उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत, उद्या गुरुवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे, मोठ्या राजकीय हालचाली घडू शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.