अतिवृष्टीनं बळीराजावर सूड उगारलाय...तर लेकरासारखी जपलेली पीकंच नाही तर जनावरंही वाहून गेलेत...बळीराजा उद्ध्वस्त झालाय.. आणि मदतीचा हात देणाऱ्या सरकारी बँकांचा सावकारी कारभार करू लागल्या आहेत..स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक आणि, जिल्हा बँकेसह खासगी बँकांनीही कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना जप्तीची नोटीस पाठवून फास आवळायला सुरुवात केलीय..बॅंकाच्या या असंवेदनशील कारभारामुळे बळीराजा हतबल झालाय...
खरंतर मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने कहर केला... शेती उद्ध्वस्त झाल्यानं शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत आहे... त्यातच सरकारने अत्यंत तुटपुंजी 8500 रुपये हेक्टरी मदत केलीय.. मात्र एकट्या धाराशिव जिल्ह्याच्या 8 तालुक्यात कारवाईसाठी 1 हजार 369 जणांना नोटीस पाठवण्यात आलीय.. त्यामुळं जगायचं कसं आणि कर्ज भरायचं कसं? अशा कात्रीत बळीराजा सापडलाय..एवढी विदारक परिस्थिती असताना बँकेने उद्ध्वस्त शेतकऱ्याला नोटीस देऊन त्याच्या जखमेवर मीठ चोळलं...
रझाकारी पद्धतीने नोटीसा देणाऱ्या बँकांना वसुली थांबवण्याचे आदेशच मुख्यमंत्र्यांनी दिलेत.
राज्यात 147 लाख हेक्टरवर पेरणी झाली.. त्यापैकी फक्त ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात 60 लाख हेक्टरचं नुकसान झालंय.. तर शेतकऱ्यांकडे तब्बल 35 हजार कोटी रुपयांचं थकित कर्ज आहे. आता ज्या पिकांच्या भरवशावर कर्ज घेतलं होतं..
ते पिकचं नाही तर जमीनही खरवडून गेलीय.. त्यामुळं फक्त खरीपच नव्हे तर रब्बी हंगामही हाती लागण्याची शक्यता नाही... त्यामुळे पिचलेल्या शेतकऱ्याला वसुलीच्या नोटीसा देतांना बँक अधिकाऱ्यांना थोडी तरी लाज वाटायला हवी..एवढंच नव्हे तर सरकारनेही फक्त कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती न देता बळीराजाला पुन्हा उभं करण्यासाठी कर्जमुक्तीचा बुस्टर डोस देण्याची गरज आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.