Bank of Maharashtra  (संग्रहित छायाचित्र)
महाराष्ट्र

महाराष्ट्र बँकेवर दिवसाढवळ्या दरोडा; १५ मिनिटांत ६ कोटींच्या सोन्यासह रोकड लंपास

Bank of Maharashtra heist : झारखंडमधील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत दिवसाढवळ्या दरोडा टाकत 5 जणांच्या टोळीने अवघ्या 15 मिनिटांत कोट्यवधींची रोकड आणि सोने लुटले. पोलिसांकडून तपास सुरू असून आरोपी फरार आहेत.

Namdeo Kumbhar

Bank of Maharashtra robbery Jharkhand Barhi branch details : बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत ५ जणांनी दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा टाकला आहे. अवघ्या १५ मिनिटांत दरोडेखोरांनी बँकेतील ६ कोटींहून अधिक किमतीचे सोने आणि रोकड लंपास केली. झारखंडमधील बरही येथील शाखेत शुक्रवारी ही घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी शहरात नाकाबंदी करून तपास सुरू केला आहे, मात्र दरोडेखोर अद्याप फरार आहेत.

शुक्रवारी संध्याकाळी बरही शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत सशस्त्र गुन्हेगारांनी हा धाडसी दरोडा टाकला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ५ जणांच्या टोळीने दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास नियोजनबद्ध रितीने हा दरोडा टाकला. बँकेचे उपव्यवस्थापक रौशन सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला दोन तरुण चालू खाते (Current Account) उघडण्याच्या बहाण्याने शाखेत शिरले. त्यानंतर काही वेळातच त्यांचे इतर ३ साथीदार तिथे पोहोचले.

या पाचही जणांनी शस्त्रांचा धाक दाखवून कर्मचारी आणि ग्राहकांना ओलीस धरले. कर्मचाऱ्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, दरोडेखोरांनी बँक व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली. एखाद्या चित्रपटासारखा अवघ्या १५ मिनिटांत दरोडेखोरांनी बँकेवर डल्ला मारला आणि पसार झाले.

दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांना एका खोलीत कोंडून तिजोरीच्या चाव्या घेतल्या. त्यानंतर सुमारे ४ किलो सोने आणि ५ लाख रुपयांची रोकड घेऊन त्यांनी पळ काढला. या सोन्याची किंमत ७ कोटी रुपयांहून अधिक असल्याचे सांगितले जात आहे. कोणालाही पाठलाग करता येऊ नये, यासाठी दरोडेखोरांनी पळून जाताना बँकेला बाहेरून कुलूप लावले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : बौद्धभूमी फाउंडेशन प्रकरणात मोठी अपडेट; श्रीकांत शिंदेंनी KDMC आणि MMRDA ला दिले सखोल चौकशीचे आदेश

कर्जमाफीच्या अटी, शेतकऱ्यांसाठी कटकटी; केवळ 17 लाख शेतकऱ्यांनाच संपूर्ण कर्जमाफी?

'मोदींचे सरकार जाणार, आणीबाणी येणार'; राहुल गांधींचा खळबळजनक दावा

Fact Check: शाहरूख खान कॉकरोच जनता पार्टीत जाणार? लवकरच पार्टी जॉईन करण्याची घोषणा?

फुले दिले की फुलेच मिळतात, कुणी टीका केली, तरी शांत राहायचं; जॅकी श्रॉफ असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT