Ladki Bahin Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Buldhana News : संतापजनक! बँक मॅनेजरची अरेरावी, 'लाडक्या बहिणी' बॅंकेतच ढसाढसा रडल्या, VIDEO समोर

Bank manager argument with women Ladki Bahin Yojana : बुलढाण्यात बॅंकेमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी आलेल्या महिलांसोबत गैरप्रकार झाल्याचं समोर आलंय. बॅंक मॅनेजरची उद्धट वर्तवणूक समोर आलीय.

Rohini Gudaghe

संजय जाधव, साम टीव्ही बुलढाणा

बुलढाणा जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी आलेल्या महिलांसोबत बँक मॅनेजरने अरेरावी केल्याची घटना समोर आलीय. बॅंक मॅनेजरच्या उद्धट वागणुकीमुळे मूकबधीर महिलेला अश्रू अनावर झाले होते. महिलांसह बँक ग्राहकांना उद्धट वागणूक देत असल्याचा बॅंक मॅनेजरचा व्हिडिओ देखील समोर आलाय. आपण या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेवू या.

बॅंक मॅनेजरची उद्धट वर्तवणूक

राज्यात लाडकी बहिण योजनेचे पैसे खात्यात जमा झाले (Bank manager Video) आहेत. बँकेत पैसे काढण्यासाठी बॅंकेत महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचं दिसतंय. तर काही महिलांचे ई केवायसी राहिले आहे, ते करण्यासाठी देखील महिला बँकेत गर्दी करीत आहेत. दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर पांग्रा या गावातील स्टेट बँकेमध्ये देखील महिलांनी गर्दी केली होती.

बुलढाण्यातील संतापजनक प्रकार

मात्र, बँक मॅनेजरने महिलांशी हुज्जत घालित त्यांना अपमानीत (Ladki Bahin Yojana last Date) केलं. त्यांना उद्धट बोलला , त्यामुळे अनेक महिला रडताना (Buldhana News) दिसल्या. मॅनेजरने एका मूकबधीर महिलेला सुद्धा अपमानित केल्याने ती महिला ढसाढसा रडली, ही घटना कॅमेऱ्यात कैद झालीय. याची दखल घेत भाजपा प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांनी तात्काळ बँक गाठली. त्यांनी बँक मॅनेजरची चांगलीच कान उघडणी केलीय .

घटनेचा व्हिडिओ समोर

ठिकठिकाणी बँक मॅनेजर महिलांना नाहक त्रास देत असल्याच्या असंख्य तक्रारी येत आहेत. बुलढाण्यात यावेळी बँकेत महिलांसह ग्राहकांनी एकच गर्दी केली होती. भाजप प्रवक्ते विनोद वाघ यांनी बॅंक मॅनेजरला चांगलेच खडेबोल सुनावले (Ladki Bahin Yojana) आहेत. आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतो की, बॅंकेत महिलांची गर्दी झालेली आहे. बॅंकेत महिला रडत असल्याचं दृश्य देखील कॅमेऱ्यामध्ये कैद झालंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सरकार कर्ज मुक्ती कधी करणार? उद्धव ठाकरेंचा शासनाला रोखठोक सवाल

Kidney Health: किडनी खराब होण्याची ५ महत्त्वाची लक्षणे, दुर्लक्ष केल्यास होतील गंभीर आजार

Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, भायखळ्याजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड; मुंबईकडे येणाऱ्या लोकल खोळंबल्या| VIDEO

Bigg Boss 19: भैया से सैयां...; विकेंड का वारमध्ये सलमान खाननेच केली तान्या मित्तलची पोलखोल

Shocking News : रात्री झोपेतून उठवलं अन् गच्चीवर नेलं, १४ वर्षीय मुलीवर बलात्कार; नातेवाईकाचं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT