Onion Farmers Saam Tv
महाराष्ट्र

Onion Farmers: कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणलं पाणी; निर्यात बंदीमुळे भाव निम्म्यानं घसरले

Ban On Export Of Onion: चार एकरमध्ये कांद्याची पेरणी केल्यानंतर देखील उत्पन्न पाहिजे तेवढं मिळत नाही. अशातच चार एकराला १ लाख रुपये खर्च करून देखील हातात फक्त ३० हजार रुपये आले आहेत.

Ruchika Jadhav

सुशील थोरात

Onion Farmers:

महाराष्ट्र राज्यासह अहमदनगर जिल्ह्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती असतानाच केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे. अशातच कांदा निर्यातीवर बंदी घातल्यानंतर कांद्याचे भाव कोसळले आहेत. कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात कांद्याने पाणीच आणलंय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चार एकरमध्ये कांद्याची पेरणी केल्यानंतर देखील उत्पन्न पाहिजे तेवढं मिळत नाही. अशातच चार एकराला १ लाख रुपये खर्च करून देखील हातात फक्त ३० हजार रुपये आले आहेत. म्हणजेच चार एकराला एक लाख खर्च करून साठ हजार रुपयांचा तोटा कांदा शेतकऱ्याला सहन करावा लागत आहे.

कांदा (Onion) उत्पादन घेण्यासाठी बियाणे, गोणी खत, पेरणी, खुरपणी, कापणी या सर्व गोष्टी करण्यासाठी शेतकऱ्यांना अफाट खर्च करावा लागतो. खर्च केल्यानंतर मात्र मुद्दल देखील शेतकऱ्यांना मिळत नाही. आज शेतकऱ्यांचा कांदा सात ते आठ रुपये प्रति किलो घेतला जात आहे.

जर केंद्र सरकारने निर्यात बंदी केली नसती तर हाच कांदा किमान 30 ते 35 रुपये भावाने घेतला गेला असता. केंद्र सरकारच्या मोठ्यापणामुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीच शिल्लक राहत नसल्याने शेतकरी फार चिंतेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

SCROLL FOR NEXT