anda point, y junction magic point, raigad police saam tv
महाराष्ट्र

वाहतुकदारांनाे ! Mumbai Pune Expressway वरुन जाणार आहात ? जिल्हाधिका-यांचा नवा आदेश वाचा

हाईट बॅरीअरला जोरदार धडक दिल्यामुळे हाईट बॅरिअरचे पूर्णपणे नुकसान झाले.

Siddharth Latkar

Raigad News : खालापूर तालुक्यातील बोरघाट (borghat) हद्दीतील अंडा पॉईंट व वाय जंक्शन मॅजिक पॉईंट या ठिकाणी असलेल्या 2.5 मीटर उंचीच्या हाईट बॅरिअर उंची पेक्षा जास्त उंचीवरील वाहनांना वाहतूक बंदीचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे (dr. yogesh mhase raigad collector) यांनी केले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी सुरु झाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी दिली. पुढील आदेशपर्यंत वाहनधारकांनी सहकार्य करावे असे आवाहन शिर्के यांनी केले आहे. (Maharashtra News)

महामार्ग सुरक्षा पथक, रायगड परिक्षेत्रातील म.पो. केंद्र बोरघाटच्या हद्दीमधील एन.एच. 48 वरील शिंग्रोबा मंदिराच्या पाठीमागील वन वे बाजूस असलेल्या खिंडीतील उतारावर व वळणावर बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने काही महिन्यांपुर्वी बस दरीत पडून झालेल्या अपघातात "बाजीप्रभू झांज पथक" गोरेगाव मुंबई येथील किशोरवयीन मुलांमुलीपैकी 13 जण जागीच मृत्युमुखी पडले होते. तसेच 29 जण गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर खोपोली पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

अंडा पॉईंट (anda point) व मॅजिक पॉईंट (y junction magic point) या ठिकाणी हाईट बॅरिअर बसविण्याबाबत यापूर्वी कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य रास्ते विकास महामंडळ यांना कळविण्यात आले होते. अपघात घडल्यानंतर मुख्यमंत्री व इतर मंत्री महोदयांनी घटनास्थळी भेटी दिल्या होत्या. तसेच रस्ता सुरक्षा समिती बैठकीमध्ये सुद्धा हाईट बॅरिअर तात्काळ बसविण्याबाबत सूचना केल्याने एम.एस.आर.डी.सी यांनी सूचना केल्याप्रमाणे आय.आर. बी.मुं.पु.द्रुतगती मार्ग प्रा.लि.यांनी अंडा पॉईंट व वाय जंक्शन मंजिक पॉईंट या ठिकाणी हाईट बॅरिअर बसविले आहेत.

वाहनधारकांचे हाईट बॅरिअर उंचीकडे दुर्लक्ष

हे हाईट बॅरिअर बसविल्यानंतर काही मोटार वाहन चालक हे हाईट बॅरिअर उंचीकडे दुर्लक्ष करून वाहन चालविल्यामुळे अपघात झाले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या हाईट बॅरीअरला जोरदार धडक दिल्यामुळे हाईट बॅरिअरचे पूर्णपणे नुकसान झाले.

कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ पुणे यांनी अपर जिल्हादंडाधिकारी रायगड, ता.अलिबाग, जि. रायगड यांना पत्र दिले असून जिल्हाधिकारी रायगड यांनी यापूर्वी दि. 30 मे 2011 रोजीच्या अधिसूचनेनुसार अंडा पॉईंट या ठिकाणी असलेली रिफील लेनची लांबी अपघात प्रवण असल्याकारणाने प्रायोगिक तत्वावर 30 दिवसांकरिता प्रवेश बंद करण्यात आलेली अधिसूचना कायमस्वरुपी जारी करण्याबाबत विनंती केली.

जिल्हाधिका-यांचा आदेश

त्यानुसार (raigad) जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी या अधिसूचनेच्या दिनांकापासून (दि.26 जून 2023 रोजीपासून)पुढील आदेश होईपर्यंत खालापूर तालुक्यातील बोरघाट हद्दीतील अंडा पॉईंट व वाय जंक्शन मॅजिक पॉईंट या ठिकाणी असलेल्या 2.5 मीटर उंचीच्या हाईट बॅरिअर उंची पेक्षा जास्त उंचीवरील वाहनांना वाहतूक बंदी आदेश जारी करण्यात आला आहे.

तरी संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी श्री.संदेश शिर्के यांनी कळविले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

SCROLL FOR NEXT