BALUMAMA TEMPLE SCAM: ₹60 CRORE FRAUD EXPOSED IN KOLHAPUR DEVSTHAN saam tv
महाराष्ट्र

आयोध्येनंतर बाळूमामा देवस्थानातही घोटाळा, देवस्थानात कोट्यवधींचा आर्थिक गैरव्यवहार?

Balumama Temple Scam Kolhapur 60 Crore Fraud: आदमापूरच्या श्री संत बाळूमामा देवस्थानात कोट्यवधींचा घोटाळा उघडकीस आलाय. देवस्थान समितीतील पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्यानं राज्यभरात खळबळ उडालीये. बाळू मामा देवस्थानातील घोटाळा नेमका काय आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

कोल्हापूरच्या आदमापूर येथील श्री संत बाळूमामा देवस्थान हे लाखो भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा आणि आंध्र प्रदेशातून मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात. मात्र याच देवस्थानात तब्बल कोट्यवधींचा घोटाळा झाल्याची महिती समोर आलीये. 60 कोटी 75 लाख 28 हजार 60 रुपयांचा कथित आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आलाय. देवस्थानाच्या आर्थिक व्यवहारांमध्ये बनावट कागदपत्रे तयार करून दस्तऐवजांमध्ये फेरफार करण्यात आल्याचाही गंभीर आरोप आहे. याचीच दखल धर्मादाय आयुक्तांनी घेऊन याप्रकरणी चौकशी केलीय. चौकशी अहवालात काय आढळलं ते पाहूयात.

बाळूमामा देवस्थानात कोट्यवधींचा घोटाळा

बकरी पालन व विक्रीतील अनियमितता

जमीन खरेदी-विक्री व्यवहारांतील संशय

महाप्रसाद उत्सवासाठी विनानिविदा खरेदी

प्रक्रियेचं पालन न करता आर्थिक व्यवहार

निविदा प्रक्रियेत गंभीर त्रुटी

या चौकशी अहवालानंतर देवस्थान शाखेचे निरीक्षक राजेंद्र गडकरी यांच्या तक्रारीवरून तत्कालीन निरीक्षण अधिकारी तथा कार्याध्यक्ष रागिणी खडके, तत्कालीन सचिव रावसाहेब कोणकेरी यांच्यासह संबंधित विश्वस्त, व्यापारी, कंत्राटदार आणि मध्यस्थांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

दरम्यान, या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याचा दावा करण्यात येत असून भाविकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. संपूर्ण प्रकरणाची गरज भासल्यास ईडीमार्फतही तपास व्हावा, अशी मागणी भाविकांनी केलीये. आधीच देशात अयोध्या, बद्रीनाथ आणि वैष्णोदेवी मंदिरातले घोटाळे गाजताय. आता महाराष्ट्रातली मंदिरही भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकत चाललीयत. त्यामुळे धार्मिक संस्थांमधील आर्थिक व्यवहारांची पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि लेखापरीक्षणाची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झालीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT