Balasaheb Thorat Saam Tv
महाराष्ट्र

भाजपने लोकशाहीवर आघात सुरू केलाय; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल

सक्तवसुली संचालनालयानं आज, बुधवारी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी समन्स बजावले.

साम टिव्ही ब्युरो

शिर्डी : सक्तवसुली संचालनालयानं (ED) आज, बुधवारी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणात समन्स बजावले. यावरुन आता भाजपवर काँग्रेस नत्यांनी आरोप केले आहेत. यावर आज मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रीया देताना, भाजपने (BJP) लोकशाहीवर आघात सुरु केला असल्याची टीका केली.

शिर्डी येथे काँग्रेसच्या नवसंकल्प शिबिर सुरु आहे. यावेळी थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली. यावेळी समवेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रवक्ते अतुल लोंढे, डॉ. सचिन सावंत, आशिष दुवा आदी उपस्थित होते.

बाळासाहेब थोरात म्हणाले, देशात हुकूमशाही व एकाधिकारशाही वाढवणाऱ्या भाजप (BJP) सरकारने सातत्याने केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या श्रीमती सोनिया गांधी व खा.राहुल गांधी यांना दिलेली ईडीची नोटीस ही लोकशाहीची चिंता वाढवणारी असून, संपूर्ण देशातील जनता व काँग्रेसजन हे श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या पाठीशी आहेत.

केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना नामोहरम करण्याचे काम भाजप (BJP) सरकार करत आहे. देशात जातीय व धार्मिक तेढ निर्माण करून लोकशाहीवर आघात त्यांनी सुरू केला आहे, नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी श्रीमती सोनिया गांधी व राहुल गांधी यांना दिलेल्या ईडीच्या (ED) नोटीस अत्यंत दुर्देवी असून लोकशाहीची चिंता वाढवणारी आहे. भाजप सरकारकडून सातत्याने लोकशाहीवर आघात होत आहे. हे देशाच्या दृष्टीने चांगले नाही, असंही बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले.

देशात महामंदी येण्याची भीती: पृथ्वीराज चव्हाण

उदयपूर संकल्प शिबिरातील अर्थकारणाच्या गटातून मोदी सरकारच्या सध्याच्या धोरणांवर तीव्र विरोध करण्यात आला आहे. सार्वजनिक कंपन्यांच्या काही भांडवलदारांना कवडीमोल किंमतीत विक्री, राज्यांच्या अधिकारावर गदा, या मुद्दें बरोबर भविष्यातील आधुनिक तंत्रज्ञान चे मनुष्यबळ तयार करावे लागणार आहेत. 1990 चे आर्थिक बदलानंतर य टेलिकॉम व पेट्रोल या क्षेत्रातील सत्ता काही उद्योजकांच्या हाती गेली आहे. महागाईमुळे देशात महामंदी येईल अशी भीती आहे. राज्य केंद्राकडून राज्याला कायम सापत्न वागणूक दिली जात असल्याचेही, पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS TRANSFERS: राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती वाचा

ED Raids : माजी आयुक्त अनिलकुमार पवारांच्या घरी ईडीचा छापा; संपत्ती जाणून डोळे पांढरे होतील, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update: ठाण्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमंती अशिमा मित्तल यांची नियुक्ती

Tariff : ट्रम्पचा धक्का, भारताला फटका? कोण-कोणत्या उद्योगांवर होणार परिणाम, जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : राज्यातील ५० लाख बहिणी अपात्र ठरल्या; काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT