मोठी बातमी! काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ED चे समन्स

समन्स बजावल्याच्या प्रकरणावर काँग्रेसकडून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.
Rahul Gandhi And Soniya Gandhi
Rahul Gandhi And Soniya GandhiSaamTV
Published On

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयानं (ED) आज, बुधवारी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणात समन्स बजावले. या प्रकरणाची चौकशी तपास संस्थेने २०१५ मध्येच बंद केली होती. ईडीकडून पाठवण्यात आलेल्या समन्सवर (ED Summons) काँग्रेसने (Congress) टीका केली आहे. भाजपकडून आपल्या राजकीय विरोधकांना घाबरवण्यासाठी तपास यंत्रणांचा वापर करण्यात येत आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. (Soniya Gandhi And Rahul Gandhi Latest News)

Rahul Gandhi And Soniya Gandhi
सर्व करता येतं पण पैशांचे सोंग...; ST कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांचं भाष्य

काँग्रेस नेते आणि वरिष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनीही केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. आपल्या राजकीय विरोधकांना घाबरवण्यासाठी भाजपकडून तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. नॅशनल हेराल्डचा स्वतःचा एक इतिहास आहे, जो स्वातंत्र्याच्या संघर्षकाळापासून सुरू झाला होता, असे ते म्हणाले. ममता बॅनर्जी, फारूख अब्दुल्ला यांच्यासह सर्व विरोधी पक्षांचे नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या निशाण्यावर आहेत, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीने समन्स बजावल्यानंतर काँग्रेसचे नेते रणदीप सूरजेवाला यांनीही भाजप सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. १९४२ मध्ये जेव्हा नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र सुरू करण्यात आलं होतं, त्यावेळी इंग्रजांनी दबाव टाकण्यास सुरुवात केली होती. आज मोदी सरकारदेखील तेच करत आहे. त्यासाठी ईडीचा वापर केला जात आहे. ईडीने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे, असे सूरजेवाला म्हणाले.

२०१५ मध्ये चौकशी बंद

माजी केंद्रीय मंत्री सिंघवी म्हणाले की, 'सन २०१५ मध्ये ईडीने नॅशनल हेराल्ड प्रकरणाची चौकशी थांबवली होती. मात्र, या सरकारला हे सहन झाले नाही. त्यांनी ईडीच्या संबंधित अधिकाऱ्यांना हटवलं. सरकारनं नव्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून या प्रकरणाचा पुन्हा तपास सुरू केला आहे. देशातील महागाई आणि अन्य महत्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष हटवण्याच्या उद्देशाने हे केले आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com