सर्व करता येतं पण पैशांचे सोंग...; ST कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांचं भाष्य

पुणे ते अहमदनगर मार्गावर ही इलेक्ट्रिक एसटी बस बस धावणार आहे.
CM Uddhav thackeray News
CM Uddhav thackeray News
Published On

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आज (1 जून 2022) अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केलं. यानिमित्ताने आज एसटी महामंडळाच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बसचा (Electric Bus) समावेश करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या हस्ते पुण्यात शिवाई या इलेक्ट्रिक बसचं (Shivai Electric Bus) उद्घाटन करण्यात आलं. पुणे ते अहमदनगर मार्गावर ही इलेक्ट्रिक एसटी बस बस धावणार आहे. दरम्यान, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी सुद्धा ऑनलाइन उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचं कौतुक केलं तसेच त्यांच्या मागण्यावरही भाष्य केलं आहे. (CM Uddhav Thackeray News)

CM Uddhav thackeray News
Shivai Bus : एसटी महामंडळाची पहिली इलेक्ट्रिक बस धावली! अजित पवारांच्या हस्ते 'शिवाई'ला हिरवा कंदील

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले, "एखादी सेवा जी आपण रोज बघतो, तिचा वापर करतो तेंव्हा ती किती वर्षाची झाली याच्याकडे आपलं लक्ष जात नाही. आपल्या एस.टीची ७५ वर्षे अशीच आहेत. आपल्या एसटी ची सुरुवात ही १९४८ साली झाली. पहिली एस.टी कशी होती, तिचं रंगरूप आकार कसं होतं हे आज आपण चित्रफितीच्या माध्यमातून पाहिलं. आपली एस.टी काळानुरुप किती बदलली हे यातून दिसलं. एसटीची ही वाटचाल पुण्यात सुरु झाली आणि एसटीचा आजचा अमृतमहोत्सवी कार्यक्रमही पुण्यातूनच होत आहे हा एक योगायोग आहे". असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

पुढे बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, “पूर्वी वाहनं नव्हती, अनेकदा त्यांनी बैलगाडीतून प्रवास केला. सर्वांना गाडी घेऊन प्रवास करणं जमत नाही. अशावेळी सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशी सेवा देणारं मोठं काम एसटी करत आहे. भविष्य घडवण्यात एसटीचा मोठा वाटा आहे. राज्याचं, देशाचं भवितव्यदेखील तुम्ही जपत आहात. कोरोना काळात एसटीच्या कर्मचाऱ्यांनी पराक्रमच केला आहे” असंही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

CM Uddhav thackeray News
Pune : शिवाईच्या कार्यक्रमात नीलम गोऱ्हेंची मिश्कील टिप्पणी; अजित पवारांचं खास शैलीत उत्तर

"परिवारातील सदस्य म्हणून आम्ही एसटी कर्मचाऱ्यांकडे पाहत आहोत. म्हणूनच एसटी अडचणीत असतांना शासनाने मदत केली. सर्वसामान्यांना परवडणारी परिवहन सेवा देण्याच काम एसटी करत असल्याने एसटीचा तोटा वाढला मागील काही महिने, एसटी कर्मचाऱ्यांच वेतन शासनाकडून दिलं आणि पुढच्या काही वर्षाची हमी शासनाने घेतली आहे. सर्व करता येतं पण पैशांचे सोंग आणता येत नाही, एसटी कर्मचाऱ्यांसाठी जे जे करणं शक्य आहे, ते केलं आणि यापुढेही करणारच. त्यात कुठेही मागेपुढे पाहणार नाही". असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं आहे.

"सर्वात जास्त इलेक्ट्रिक बस असणारं मुंबई पहिलं शहर ठरणार आहे असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं. एसटीची सेवा प्रदूषणविरहीत कशी होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला. नव्या संकल्पना आपण आणत आहोत अन्यथा आजही चित्रपटात दिसणारी ती एसटी तशीच राहिली असती. काळानुसार गरजा वाढत असून आपणही बदलत प्रगती कऱणं उद्धिष्ट आहे" असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com