balasaheb patil, Pandharpur wari news, Shekhar Sinh, Satara News saam tv
महाराष्ट्र

Ashadhi Wari 2022 : वारकऱ्यांना पुरेशा सुविधा द्या : पालकमंत्री बाळासाहेब पाटील

सातारा जिल्ह्यात पालखी साेहळा येत्या 28 जूनला येणार आहे.

साम न्यूज नेटवर्क

सातारा (Pandharpur Wari 2022) : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या (sant dnyaneshwar maharaj palkhi sohala) विसावा व मुक्काम ठिकाणाची पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी नुकतीच पाहणी केली. यावेळी त्यांनी दत्त घाट नीरा नदी (Nira River), लोणंद (lonand), तरडगाव (taradgoan), फलटण (phaltan), विडणी (Vidni), पिंप्रद (Pimprad) व बरड (Barad) या ठिकाणाची वारकरी (Warkari) व भाविकांसाठी करण्यात आलेल्या सुविधांची पाहणी केली. (Satara Latest Marathi News)

यावेळी पाटील यांनी प्रशासनास सूचना केल्या. पाटील म्हणाले पालखी सोहळ्याचा जिल्ह्यात सहा दिवस मुक्काम आहे. पालखी सोहळ्यात येणाऱ्या वारकऱ्यांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी मिळावे यांची व्यवस्था करण्यात यावी. संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचा जिल्ह्यातील पालखी तळ व मार्गावरील रस्त्याची डागडुजी, स्वच्छता, पालखी तळावर पुरेशी तात्पुरती शौचालये, शौचालयाच्या ठिकाणी पाणी आदी सुविधा करण्यात याव्यात. पिण्याच्या पाण्याची कमतरता होणार नाही याची दक्षता घ्याव्या अशा सूचनाही पाटील यांनी यावेळी दिल्या.

पालखी तळावर महिलांसाठी स्नानगृह उभे करावीत. विसाव्याच्या ठिकाणी मुख्य रस्त्यापासून प्रवेशासाठी व बाहेर पडण्यासाठी रस्ता रॅम्प तयार करण्यात यावा. पालखी मार्गावरील व मुक्कामाच्या ठिकाणी विजेचे खांब, तारा यांची तपासणी, पालखीच्या वेळी खासगी वाहतुकीचे नियंत्रण करण्याचेही नियोजन करण्यात यावे. वारकऱ्यांच्या व भाविकांच्या सोईसाठी ठिकठिकाणी पुरेशी आरोग्य व्यवस्था करण्याचे निर्देशही पालकमंत्री पाटील यांनी प्रशासनाला दिले. पालखी सोहळ्यादरम्यान पर्यायी वाहतूक व्यवस्थेचे योग्य नियोजन करावे. प्रशासनाने स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ यांचे सहकार्य घेऊन पालखी सोहळा यशस्वी करावा असेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

यावेळी आमदार दिपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, फलटणचे प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय मुनगीलवार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व त्या त्या ठिकाणचे स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान पंढरपूरच्या आषाढी वारी (Pandharpur Ashadhi Wari 2022) निमित्त पायी वारी जाणाऱ्या दिंडीना श्री बळीराजा सोशल फाउंडेशन, बाळुपाटलाचीवाडी व श्री विठ्ठल भक्त खंडाळा तालुका वारकरी सांप्रदाय प्रसारक मंडळ यांच्यावतीने मेडिकल किट, पताका, ज्ञानेश्वरी आदी साहित्याचे वाटप व वारकऱ्यांचा सन्मान सोहळा लोणंद (ता.खंडाळा) येथे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते झाला.

यावेळी बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष उत्तमराव सावंत, ह.भ.प.शंकराव मर्दाने, शामराव पवार, जयवंतराव यादव, सोशल फाउंडेशन, बाळुपाटलाचीवाडी आणि खंडाळा तालुक्याच्या वारकरी सांप्रदाय प्रसारक मंडळाचे पदाधिकारी, तालुक्यातील विविध ठिकाणाहून आलेले दिंडीचे चालक, वारकरी व नागरिक उपस्थित होते.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Drinks: हिवाळ्यात हे आरोग्यदायी पेय प्या आणि शरीराला ठेवा उबदार

असंख्य घरांमध्ये लपलीये एक मांजर; तुम्ही १० सेकंदात शोधून दाखवाच!

Solapur Airport: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! सोलापूरकरांना आता मुंबई आणि गोव्यासाठी करता येणार हवाई सफर

Jui Gadkari: जुई गडकरी शुटिंग सुरू असताना सेटवर फावल्या वेळेत काय करते? Video केला शेअर

Pav Bhaji: घरच्या घरी स्ट्रीट स्टाईल पावभाजी कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT