shambhuraj desai, eknath shinde, satara, patan saam tv
महाराष्ट्र

ही तर परिवर्तनाची नांदी ! एकनाथ शिंदेंसह बंडखाेर शिवसैनिकांनी केलं शंभूराज देसाईंचे अभिनंदन

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणाकडे देशवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.

Siddharth Latkar

सातारा : लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या (balasaheb desai sugar factory) निवडणुक यंदा बिनविरोध झाली आहे. ही निवडणुक बिनविराेध झाल्याने सर्व संचालकांचे नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे (shivsena) बंडखाेर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह गुवाहटीत असलेल्या सर्व आमदारांनी राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांचे अभिनंदन केले. (shambhuraj desai latest marathi news)

पाटण (satara) तालुक्यातील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुक नुकतीच लागली हाेती. राष्ट्रवादीचे नेते सत्यजीतसिंह पाटणकर (satyajeetsinh patankar) यांच्या गटाने पाटण तालुक्यात साखर कारखाना सुरु केल्याने यंदा देसाई कारखान्याची निवडणुक लढविणार नसल्याची घाेषणा नुकतीच केली हाेती. त्यानंतर अन्य छाेट्या माेठ्या संघटनांनी देखील देसाई कारखाना निवडणुक लढविणार नसल्याची भुमिका घेतली. त्यामुळे यंदा लाेकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखाना निवडणुक बिनविराेध झाली आहे.

सध्या गुवाहटीत असलेले आमदार शंभूराज देसाई यांनी कारखाना निवडणुक बिनविराेध झाल्याची माहिती समाज माध्यमातून देत ही परिवर्तनाची नांदी असल्याचे म्हटले आहे. शंभूराज लिहितात लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत बिनविरोध संचालक व कारखान्यावर आपल्या (कै.) शिवाजीराव देसाई शेतकरी पॅनेलची सत्ता स्थापन झाली आहे. याबद्दल एकनाथ शिंदे (eknath shinde latest updates) यांनी सत्कार करुन माझे अभिनंदन केले. यावेळी शिवसेनेचे सहकारी आमदार उपस्थित होते.

दरम्यान ही परिवर्तनाची नांदी आहे. शिवसेनेच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही कायम कटिबद्ध आहोत असेही देसाईंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पारा घसरला, मुंबई-पुण्यासह राज्यात थंडीची लाट

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! आठव्या वेतन आयोगाबाबत ७ नवीन अपडेट समोर

Kolhapuri Misal Recipe : खवय्यांनो घरी १० मिनिटांत बनवा अस्सल कोल्हापुरी झणझणीत मिसळ, वाचा रेसिपी

Ajit Pawar : पक्षाने आम्हाला कोललं तर... पुणे जिल्हाध्यक्षांचा अजित पवारांना इशारा, इंदापूरमध्ये नेमकं काय घडतेय?

Winter Update : हुडहुडी वाढली! तापमान २ ते ८ अंशांनी घसरलं, मुंबई पुण्यासह राज्यात गुलाबी थंडी

SCROLL FOR NEXT