Man ya Bail  Saam Tv
महाराष्ट्र

Hindkesari Manya: १०० तोळे सोनं, ७९ बुलेट, १५० बाईक अन् बरंच काही; मन्या बैलाची बक्षिसांची यादी वाचून थक्क व्हाल!

Hindkesari Manya Bail : मन्या बैलाने खेड तालुक्यात आपल्यासह आपल्या मालकाचंही नाव मोठं केलं आहे. यासह मन्या बैलाने मालकाला मोठी संपत्ती कमावून दिली आहे.

रोहिदास गाडगे

Manya Bail News :

पश्चिम महाराष्ट्रातील बैलगाडा घाटात आधिराज्य गाजवणारा सप्तहिंदकेसरी मन्या बैलाचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला. खेड तालुक्यातील वाफगाव येथे मन्या बैलाचा आज दशक्रिया विधीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी हजारोंच्या संख्येने मन्या बैलाचे चाहते येथे उपस्थित होते.

प्रत्येकाच्या डोळ्यात मन्याच्या आठवणीने अश्रू तरळले. मन्या बैलाने बैलगाडा शर्यतीत अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. या आठवणींना अनेकांनी उजाळा दिला.

मन्या बैलाने खेड तालुक्यात आपल्यासह आपल्या मालकाचंही नाव मोठं केलं आहे. यासह मन्या बैलाने मालकाला मोठी संपत्ती देखील कमावून दिली आहे. मन्या बैलाने जिंकलेल्या बक्षिसांचा आकडा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. (Pune News)

मन्या बैलाने अनेक शर्यतीत बाजी मारली. यामध्ये मन्या बैलाने जेसीबी, कार, बाईक, सोनं, रोख रक्कम अशी कोट्यवधींची बक्षिसे पटकावली आहेत. या बक्षिसांची यादी भलीमोठी आहे. बैलगाडा शर्यतीच्या घाटात पहिलं नाव मन्या बैलाचंच निघतं. न हरणार योद्धा अशी ओळख मन्याने निर्माण केली होती. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मन्या बैलाच्या आठवणीत त्याच्या दशक्रिया विधीच्या दिवशी नवीन गाणं देखील करण्यात आलं आहे. मन्याचा पुतळा साकारणार असल्याची भावना देखील त्याच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे.

मन्या बैलाने 18 वर्षात जिंकलेली बक्षिसे

  • जे.सी.बी. - 1

  • पिकअप - 2

  • ट्रॅक्टर - 3

  • बोलेरो - 3

  • स्कॉर्पिओ - 1

  • थार - 1

  • बुलेट - 79

  • मोटर सायकली - 150

  • सोने - 100 तोळे

  • एक कोटी रूपयांपेक्षा जास्त रोख रक्कम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care: खूप ऑपन पॉर्स झालेत? मग सॉफ्ट स्किनसाठी हा फेसपॅक नक्की लावा, आठवड्याभरात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: परभणीत भाजपचे काँग्रेसविरोधात आंदोलन

NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण|VIDEO

Gold Rate Today: सोन्याला चकाकी! सोन्याच्या दरात ३०००० रुपयांची वाढ, आजचे 18K- 22K आणि 24K चे दर किती?

Face Care: सतत चष्मा लावल्याने नाकावर पडलेले डाग कसे घालवायचे ? जाणून घ्या घरगुती सोपे उपाय

SCROLL FOR NEXT