Bageshwar Dham Baba Dhirendra Krishna Shastri Reaction on maratha reservation Saam TV
महाराष्ट्र

Maratha Reservation: मराठा आरक्षणासंदर्भात बागेश्वर धाम बाबांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, 'देश संकटात असताना...'

Bageshwar Dham Baba Reaction: बागेश्वर धाम बाबा यांनी मराठा आरक्षणाबाबत महत्वाची टिप्पणी केली आहे.

Satish Daud

Bageshwar Dham Baba Reaction

सध्या राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. यासाठी त्यांनी सरकारला अल्टिमेटम सुद्धा दिला आहे. अशातच बागेश्वर धाम बाबा यांनी मराठा आरक्षणाबाबत महत्वाची टिप्पणी केली आहे.

आपल्या शौर्याने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या मराठ्यांना आरक्षण मिळणे हा त्यांचा हक्क आहे. सरकारने त्यांच्याशी चर्चा करून मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, असं बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री महाराज म्हणाले.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मनातील गोष्ट वाचता येणे हा एक वेगळा विषय आहे. अधिकारांची गोष्ट करणे, हा एक वेगळा विषय आहे. भारत जेव्हा संकटात होता, तेव्हा आपल्या शौर्याने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या जमातीला आरक्षण मिळणे हा त्यांचा हक्क आहे. सरकारने त्यांच्याशी (मराठा बांधवांसोबत) चर्चा करून मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण दिले पाहिजे, असंही बागेश्वर धाम बाबा म्हणाले.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये बागेश्वर धाम बाबांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी मराठा आरक्षणाविषयी विचारलेल्या प्रश्नांना सडेतोड उत्तरं दिली.

सोमवारपासून बागेश्वर धाम रामकथा कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. त्यांचे प्रवचन ऐकण्यासाठी लाखो लोकांनी गर्दी केली होती. क्रांतीचौकातून दुपारी निघालेल्या कलश यात्रेत मोठ्या प्रमाणावर भाविक सहभागी झाले होते. यात महिला; तसेच मुलांचा लक्षणीय सहभाग होता. ‘जय श्रीराम’च्या जयघोषात आणि विविध भक्तीगीतांमध्ये ही मिरवणूक हळूहळू अयोध्यानगरीकडे झेपावली.

खास रथावर आरुढ झालेले भगवान श्रीराम, सीता, लक्ष्मण व हनुमानाचे सजीव देखावे हेदेखील यात्रेचे आकर्षण होते. भगव्या पताका हाती घेतलेले आणि ओठी श्रीरामाचा जयषोघ जपत असंख्य भाविक या लांबलचक यात्रेत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. दरम्यान, मराठा आरक्षणावर बागेश्वर बाबा यांनी केलेल्या वक्तव्याची चांगलीच चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT