Badlapur Water Supply Saam tv
महाराष्ट्र

Badlapur Water Supply : बदलापुरात ऐन पावसाळ्यात पाणी कपात; आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा राहणार बंद

Badlapur News : पावसाळ्यात धरणात पुरेसा पाणी साठा निर्माण होत असताना बदलापूर मधील नागरिकांना आठवड्यातील एक दिवस पाणी मिळणार नाही. जीवन प्राधिकरण कडून काही दिवसांसाठी हा निर्णय आहे

Rajesh Sonwane

मयुरेश कडव 
बदलापूर
: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून बदलापूर शहरात पाणी कपात लागू करण्यात आली आहे. आठवड्यातून एक दिवस शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस बदलापूरकरांना पाणी संकटाला सामोरे जावं लागणार आहे. ऐन पावसाळ्यात हा निर्णय लागू करण्यात आल्याने पाण्याचा वापर देखील काटकसरीने करावा लागणार आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या बॅरेज धरणातील जलशुद्धीकरण केंद्रात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत आहे. तसेच पावसामुळे जलशुद्धीकरण केंद्रात गाळ साचत असून नागरिकांना गढूळ पाणीपुरवठा करावा लागत आहे. तर मातीचा गाळ साचल्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रातील गाळण व्यवस्था वारंवार बंद पडत असल्या कारणाने जलशुद्धीकरण केंद्र दररोज १५ ते २० टक्के कमी क्षमतेने चालत असल्याचे समोर आले आहे. 

काही दिवस राहणार पाणी कपात 

इतकेच नाही तर जलवाहिन्यांची गळती आणि दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा वारंवार बंद ठेवावा लागत आहे. या सर्व बाबींचा विचार करून आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय जीवन प्राधिकरण कडून घेण्यात आला आहे. यामुळे पुढील काही दिवस बदलापूरमधील नागरिकांना एक दिवस पाणी मिळणार नसून नागरिकांनी सहकार्य करावं; असं आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे. 

नागपुरातही पाण्याचा शट डाऊन 

नागपूर : नागपूर शहरात देखील ५ ऑगस्ट सकाळी १० वाजेपासून ६ ऑगस्टच्या रात्री १० वाजेपर्यंत म्हणजे ३६ तासांचा पाण्याचा शट डाऊन असणार आहे. पेंच- एक जलशुद्धीकरण केंद्रांतर्गत पाणीपुरवठ्याच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी मंगळवारपासून हा शट डाऊन घेतला जाणार आहे. गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांना आवश्यक पाणीसाठा करून ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: AI द्वारे बनवला बहीण-भावाचा अश्लिल व्हिडीओ, नंतर केलं ब्लॅकमेल; तरुणाची आत्महत्या

Shocking: मी जगू शकत नाही...; बायको प्रियकरासोबत पळून गेली, वकिलाने संपवलं आयुष्य

Shreyas Iyer Health Update: श्रेयस अय्यर आयसीयूमधून बाहेर; अय्यरला नेमकी दुखापत काय झाली, कधी होईल ठणठणीत?

Nashik Crime: ठाकरे सेनेच्या सावकार नेत्याचा माज उतरवला; अपहरण प्रकरणी ठोकल्या बेड्या,नंतर काढली धिंड

Mumbai Accident : मुंबईत अपघाताचा थरार; छटपूजेहून परतणाऱ्या तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT