Badlapur Cylinder Blast Saam tv
महाराष्ट्र

Badlapur Cylinder Blast : बदलापूरमध्ये हातगाडीवरील सिलिंडरचा स्फोट; कचरा जाळताना झाला स्फोट, वॉचमन जखमी

Badlapur News : बदलापूरच्या मांजर्ली परिसरातील एका बंद असलेल्या स्नॅक्सच्या हातगाडीवरील सिलेंडरचा स्फोट झाला आहे. परिसरातील जमा केलेला कचरा जाळल्यानंतर सिलेंडरचा स्फोट झाला आहे. हा स्फोट एवढा भीषण होता की, त्यामुळे संपूर्ण परिसर हादरला होता.

Rajesh Sonwane

मयुरेश कडव

बदलापूर : घरगुती सिलेंडरचा वापर सर्रासपणे अवैधपणे केला जात आहे. हा वापर करताना सिलेंडरचा स्फोट होण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशाच प्रकारे बदलापूरमध्ये नाश्त्याच्या हातगाडीवर असलेल्या सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात इमारतीमधील वॉचमन जखमी झाला आहे. हि संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. 

बदलापूरच्या मांजर्ली परिसरातील एका बंद असलेल्या स्नॅक्सच्या हातगाडीवरील सिलेंडरचा स्फोट झाला आहे. परिसरातील जमा केलेला कचरा जाळल्यानंतर सिलेंडरचा स्फोट झाला आहे. हा स्फोट एवढा भीषण होता की, त्यामुळे संपूर्ण परिसर हादरला होता. इतकेच नाही तर आजूबाजूच्या इमारतीतील घरांच्या काचा देखील फुटल्या आहेत. तसेच इमारतीचा वॉचमन जखमी झाला आहे. या स्फोटाचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

तीन- चार महिन्यांपासून बंद होती हातगाडी 

दरम्यान स्फोट झाला ती हात गाडी गेल्या अनेक दिवसांपासून बंद होती. सकाळी दहा वाजताच्या सुमारास बाजूच्या इमारतीतील वॉचमन हा हात गाडीच्या बाजूला परिसरातील कचरा जाळत होता. यावेळी आगीचा सिलेंडरशी संपर्क झाला आणि त्यामुळे सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. गेल्या तीन ते चार महिन्यापासून ही हात गाडी बंद होती. याठिकाणी असलेल्या सिलेंडरमधून गॅस लिकेज होत असल्याने हा स्फोट झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

वॉचमन जखमी 

दरम्यान सकाळी थंडी जाणवत असल्याने आणि परिसरात कचरा जमा झाल्याने तो पेटविण्यासाठी वॉचमन गेला होता. मात्र या हात गाडीमध्ये एक सिलेंडर होता. याबाबत वॉचमनला कल्पना नव्हती. कचरा पेटविल्याने अचानक भडका उडून स्फोट झाला. यात वॉचमन जखमी झाला आहे. आग लागल्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhakari Tips: कोणत्या व्यक्तींनी बाजरी आणि नाचणीची भाकरी खाणं टाळावे?

भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात बॅग भरून पैसे, स्वतः निलेश राणेंनी केलं स्टिंग ऑपरेशन राणेंची धाड|VIDEO

Vande Bharat Train: वंदे भारत स्लीपर, अमृत भारत; २०२६ मध्ये लॉन्च होतील नवीन ट्रेन; असतील हजारो खास फीचर्स

Pune Accident : पुण्यात पुन्हा भीषण अपघात; महामार्गावर ४ वाहनांची एकमेकांना धडक

Maharashtra Live News Update: हसन मुश्रीफ यांची पुन्हा शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्यावर टीका

SCROLL FOR NEXT