badlapur news  saam tv
महाराष्ट्र

Badlapur |एसी लोकलच्या विरोधात बदलापूरकर संतप्त; थेट स्टेशन मास्तरांनाच घातला घेराव

बदलापूरच्या रेल्वे प्रवाशांचा वातानुकूलीत लोकलविरोधात संताप पाहायला मिळाला आहे.

अजय दुधाणे

Badlapur News : कळवा रेल्वे स्थानकांतील वातानुकूलीत रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या वाढल्याने काही दिवसांपूर्वीच रेल्वे रोखत आंदोलन केले. त्यानंतर आता बदलापूरच्या रेल्वे प्रवाशांचा वातानुकूलीत लोकलविरोधात संताप पाहायला मिळाला आहे. संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी सुरू करण्यात आलेली सीएसएमटी-बदलापूर वातानुकूलीत लोकल रद्द करावी, या मागणीसाठी प्रवाशांनी बदलापूरच्या स्टेशन मास्तरांना घेराव घातला. दिवसेंदिवस मध्य रेल्वेच्या स्थानकांवरील प्रवाशांचा वातानुकूलीत रेल्वेगाड्यांना विरोध वाढताना दिसत आहे.

सीएसएमटीहून बदलापूरसाठी संध्याकाळी ५ वाजून २२ मिनिटांनी फास्ट लोकल सुटते. मात्र, काही दिवसांपासून या लोकलच्या वेळेत स्थानकावर वातानुकूलीत लोकल येत आहे. त्यामुळे या लोकलच्या मागून सुटणाऱ्या ५ वाजून ३३ मिनिटांच्या खोपोली फास्ट लोकलने बदलापूरकरांना यावं लागतं. या लोकलला अचानक प्रवाशांची संख्या वाढल्यानं मोठी गर्दी होऊ लागली आहे. दुसरीकडे ऐन गर्दीच्या वेळी वातानुकूलीत लोकल मात्र रिकामीच जात असल्यानं प्रवाशांमध्ये संताप होत आहे.

दरम्यान, सोमवारी, संध्याकाळी ७ च्या सुमारास खोपोली लोकलने उतरलेल्या बदलापूरकरांनी थेट स्टेशन मास्तर ऑफिस गाठत संताप व्यक्त केला. तसंच गर्दीच्या वेळी सोडली जाणारी वातानुकूलीत लोकल बंद करत त्याजागी पुन्हा साधी लोकल सोडण्याची मागणी केली. त्यावर स्टेशन मास्तरांनी प्रवाशांची मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पोहोचवली जाईल आणि योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन दिल्यानंतर प्रवाशांनी माघार घेतली. मात्र, या घटनेमुळे बदलापूर रेल्वे स्थानकात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad Live : आमदार संतोष बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Winter Fashion: हिवाळ्यात स्टायलिश लूकसाठी या टिप्स नक्की फॉलो करा, मिळेल ट्रेंडी आणि ग्लॅमरस लूक

Maharashtra Live News Update: निलेश राणे मालवण पोलीस ठाण्यात दाखल

Olya Naralache Vade: जेवणाला पुऱ्याच कशाला? बनवा पांरपांरिक पद्धतीने कुरकुरीत ओल्या नारळाचे वडे

Winter Health : थंडीत पायाला जखम झाली? ताबडतोब करा 'हे' प्रभावी घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT