Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News : उतारावर एकामागून एक तीन गाड्या घसरल्या; वांगणी- बदलापूर महामार्गावर विचित्र अपघात, दोनजण गंभीर जखमी

Badlapur News : वांगणी- बदलापूर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. काही ठिकाणी डांबरी पॅच मारले आहेत. पॅच मारताना पुरेशी काळजी न घेतली गेल्यामुळे पावसामुळे रस्ता निसरडा बनला

Rajesh Sonwane

मयुरेश कडव 
बदलापूर
: वांगणी- बदलापूर मुख्य हायवेवर आज सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. पावसामुळे इथला डांबरी रस्ता निसरडा झाल्यामुळे तीन वाहनं उलटली. यात दोन मालवाहू पिकअप आणि एका स्कूटरला अपघात झाला. या अपघातात दोन वाहन चालक गंभीर जखमी झाले आहेत. पावसाळ्यात हा रस्ता वाहन धारकांसाठी जीवघेणा ठरत आहे. 

कल्याण- कर्जत राज्य महामार्गावरील वांगणी- बदलापूर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. काही ठिकाणी या रस्त्याला ठेकेदाराने डांबरी पॅच मारले आहेत. मात्र हे पॅच मारताना पुरेशी काळजी न घेतली गेल्यामुळे पावसामुळे रस्ता निसरडा बनला आहे. अवकाळी पावसामुळे हा रस्ता वाहन धरणकांसाठी जीवघेणा ठरू लागला आहे. दरम्यान आज सकाळी याच ठिकाणी अपघात झाला आहे. 

एका मागून एक तीन वाहने झाली पलटी 

पावसामुळे धोकेदायक झालेल्या या रस्त्यावर आज सकाळच्या सुमारास वांगणीतील गणेश घाटाजवळ दोन मालवाहू पिकअप आणि एक स्कूटर घसरली. अपघात इतका भीषण होता, कि तीनही वाहनांनी पलटी मारली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी ट्रक चालक आणि स्कूटर चालक गंभीररित्या जखमी झाले आहेत. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेत मदतीचा हात दिला. 

कंत्राटदाराचा निष्काळजीपणा 

रस्ता बनवताना कंत्राटदाराने निष्काळजीपणा केल्यामुळेच हे अपघात झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने याची दखल घेऊन अपघात टाळण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याची मागणीही करण्यात येत आहे. दरम्यान आगामी काळात पावसाळ्यात असे आणखी अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT