eknath Shinde  
महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट, शिंदेंच्या शिवसेनेकडून हा माजी मंत्री विधानपरिषदेवर जाणार

Bachchu Kadu joining Shinde Sena MLC election details : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विधान परिषद निवडणूक लढवण्याची शक्यता असून पक्ष विलिनीकरणाचीही चर्चा रंगली आहे.

Namdeo Kumbhar

Bachchu Kadu MLC election : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू आज विधान परिषदेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. बच्चू कडू हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ही निवडणूक लढवणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, बच्चू कडू हे 'प्रहार' हा राजकीय पक्ष शिवसेनेत विलीन करणार आहेत. मात्र 'प्रहार' ही सामाजिक संघटना कायम राहणार आहे. पुढील सहा महिन्यांत बच्चू कडू यांना शिवसेनेकडून मंत्रीपद दिले जाणार असल्याचेही सूत्रांकडून समजते. या संदर्भात एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यामध्ये बैठक पार पडली. शिवसेनेत बच्चू कडू यांना मोठी जबाबदारी दिली जाणार आहे. ज्या शिवसेनेतून बच्चू कडू यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती, त्याच शिवसेनेत आपला पक्ष विलीन करून ते आता शिवसेनेचे आमदार होणार आहेत. आज सकाळी ११ वाजेनंतर ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्येही याबाबत रात्री बैठक झाली. शिंदे यांच्या शिवसेनेची बैठक सुरू असतानाच, एकनाथ शिंदे फडणवीसांच्या भेटीसाठी 'सागर' बंगल्यावर (किंवा वर्षावर) दाखल झाले. त्या वेळी दोघांमध्ये विधानपरिषदेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. ही भेट आटोपल्यानंतर एकनाथ शिंदे पुन्हा 'नंदनवन'वर परतले.

अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस -

विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. विधानसभेच्या संख्याबळानुसार विधानपरिषद निवडणुकीत ९ जागांपैकी भाजप ५, अजित पवारांची राष्ट्रवादी १ आणि शिंदे यांची शिवसेना २ जागा लढवणार आहे; तर मविआ १ जागा लढवणार आहे. भाजपने उमेदवार जाहीर केले असले तरी, शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून अद्याप उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान, ठाकरे यांच्या शिवसेनेकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Valachi Usal Recipe : रात्रीच्या जेवणाला बनवा कोकण स्पेशल 'वालाची झणझणीत उसळ', रेसिपीत 'हा' पदार्थ टाकायला विसरू नका

Maharashtra News Live Update: मिरा-भाईंदर महानगर पालिकेबाहेर आंदोलनादरम्यान गंभीर जखमी झालेल्या सफाई कामगार महिलेचा मृत्यू

Car Insurance Fine : कार इन्श्यूरन्स नसेल तर किती कापणार चालान, किती दंड भरावा लागेल? जेलमध्येही जावं लागणार?

Face Care: नाकावर खूप ब्लॅकहेड्स झालेत? घरच्या घरी करा ही सोपी ट्रिक; तुमचा चेहरा होईल सॉफ्ट आणि ग्लोईंग

Sindhudurg : हिरव्यागार झाडांनी वेढलेला सिंधुदुर्गतील ऐतिहासिक किल्ला, गावी गेल्यावर नक्की पाहायला जा

SCROLL FOR NEXT