Bacchu Kadu Vs Sachin Tendulkar:  Saam tv
महाराष्ट्र

Bachchu Kadu: 'सचिन तेंडुलकरच्या गेमिंग जाहिरातीमुळेच बॉडीगार्डचा मृत्यू', बच्चू कडू पुन्हा आक्रमक; घरासमोर आंदोलनाचा इशारा

Bacchu Kadu Vs Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकरने ऑनलाईन गेमिंगची जाहिरात बंद करावी, अन्यथा भारतरत्न पुरस्कार परत द्यावा, अशी मागणी करत बच्चू कडूंनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Gangappa Pujari

मुंबई, ता. २१ मे २०२४

माजी क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर याच्याविरोधात प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. सचिन तेंडुलकरने ऑनलाईन गेमिंगची जाहिरात बंद करावी, अन्यथा भारतरत्न पुरस्कार परत द्यावा, अशी मागणी करत बच्चू कडूंनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, काही दिवसांपूर्वीच माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या अंगरक्षकाने आत्महत्या केली होती. ऑनलाईन रमीच्या व्यसनातून ही आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत होते. याच प्रकरणावरुन बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेत ६ जूनला शिवराज्याभिषेक सोहळ्यादिनी सचिन तेंडुलकरच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

" जो अंगरक्षक सचिन तेंडुलकर यांचे रक्षण करत होता. त्यांना इजा होऊ नये म्हणून काम करत होता. त्यालाच सचिन करत असलेल्या ऑनलाईन गेमिंगच्या जाहिरातीमुळे जीव गमवावा लागला. हे दुर्दैवी आहे, सचिन तेंडुलकरने याची जबाबदारी घेतली पाहिजे, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. तसेच सचिनने भारतरत्न परत करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी सचिन तेंडुलकरच्या जाहिरातीविरोधात याआधीही आक्रमक पवित्रा घेतला होता. गेल्यावर्षी त्यांनी सचिन तेंडुलकरच्या घरासमोर आंदोलन केले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यातही घेतले होते. आता पुन्हा एकदा बच्चू कडू यांनी सचिनविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने नवा संघर्ष होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

SCROLL FOR NEXT