Bachchu Kadu Saam Tv
महाराष्ट्र

बच्चू कडू यांच्या अडचणी वाढणार? राज्यपालांचे चौकशीचे आदेश

स्वतःच्या लेटरहेडवर बनावट दस्तऐवज बनवून शासन निधीची अफरातफर केल्याने वंचित बहुजन आघाडीने पालकमंत्री बच्चू कडू यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती.

जयेश गावंडे

अकोला : अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण राज्यपालांनी अकोल्याच्या जिल्हा पोलिस अधीक्षकांना एका प्रकरणात बच्चू कडू (Bacchu Kadu) यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे (VBA) प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिलीय.

हे देखील पाहा :

जिल्हा परिषदेने शिफारशीत केलेल्या विकास कामांना डावलून अस्तित्वात नसलली बोगस कामे स्वतःच्या लेटरहेडवर बनावट दस्तऐवज बनवून शासन निधीची अफरातफर केल्याने वंचित बहुजन आघाडीने पालकमंत्री बच्चू कडू यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्यांनी न्यायालयात (Court) धाव घेतली होती. न्यायालयाने या संदर्भामध्ये चौकशी करण्याचे आदेश दिले होते. परंतु, नियमानुसार पालकमंत्र्यांवर किंवा कोणत्याही मंत्र्यांवर चौकशी करण्यासाठी राज्यपाल यांची परवानगी लागते.

ही परवानगी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी अकोला पोलिस अधीक्षक यांना पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्याविरुद्ध योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यपाल यांच्या आदेशान्वये व अकोला (Akola) न्यायालयाने नोंदविलेले मत विचारात घेता पोलीस अधीक्षक यांनी तातडीने पालकमंत्री बच्चू कडू यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. धैर्यवधन पुंडकर यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडला बेवारस मृतदेह

तीन मच्छीमारांकडून विधवा महिलेवर आळीपाळीनं बलात्कार; घरी नेत पुन्हा अब्रूचे लचके तोडले

Hardik Pandya: हार्दिक पांड्यासोबत दिसणारी 'ही' अभिनेत्री कोण? 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटात साकारली होती खास भूमिका

Navi Mumbai Metro: वाशीमधून मेट्रो धावणार! मुंबई एअरपोर्ट आणि नवी मुंबई एअरपोर्ट झटक्यात गाठता येणार

Life expectancy with a single kidney: व्यक्ती एका किडनीवर किती जगता येतं? जाणून घ्या काय काळजी घ्यावी लागते?

SCROLL FOR NEXT