Bacchu Kadu on Eknath Shinde  Saam Tv
महाराष्ट्र

Bacchu Kadu News : बच्चू कडू सरकारचा पाठिंबा काढून घेणार?; CM एकनाथ शिंदेंना थेट इशारा

Bacchu Kadu on CM Eknath Shinde News : दिव्यांगाच्या प्रश्नावरून बच्चू कडू आक्रमक झाले आहे. बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट पाठिंबा काढून घेण्याचा इशारा दिला आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन जाधव

Pune News :

एकनाथ शिंदे यांच्या शब्दाखातर उद्धव ठाकरे यांची साथ सोडत बच्चू कडू महायुतीसोबत आले होते. मात्र आता तेच बच्चू कडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळता आहे. बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट पाठिंबा काढून घेण्याचा इशारा दिला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दिव्यांगाच्या प्रश्नावरून बच्चू कडू आक्रमक झाले आहे. दिव्यांगाना निधी न दिल्यास आम्ही तुमच्यासोबत आमदार असलो तरी 'आपको हम भूल जायेंगे' असं म्हणत सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. पुण्यात दिव्यांगाच्या भव्य नोकरी कार्यक्रमात बच्चू कडू बोलत होते.

दिव्यांगांना रोजगार मिळाला पाहिजे. दिव्यांगांचं भलं कसं होणार. नोकरी नाही तर दिव्यांगांना उद्योगासाठी काहीतरी केलं पाहिजे. यासाठी चौफेक काम करणे गरजेचं आहे. मागील ७५ वर्षांत दिव्यांगांसाठी काही खास काम झालेले नाही. अनेक गोष्टी करणे बाकी आहे, असं बच्चू कडू म्हणाले.

मनोज जरांगेंच्या मागणीवर प्रतिक्रिया

मनोज जरांगेच्या मागणीने मोठा गोंधळ होईल. आई-वडील असेल तर वडिलांचा धर्म लागतो. हा मोठा चिंतेचा विषय आहे. यावर मनोज जरांगे पाटील यांनी विचार करावा. यातून मार्ग काढावा, २४ डिसेंबरच्या आत काही लोकांना आरक्षण मिळालच आहे. हे त्याच्या आंदोलनाच यश आहे. मुख्यमंत्री यांनी भूमिका घेतली आणि कुणबी प्रमाणपत्र दिली आहेत.

अतिरेक होऊ नये, खासदार निलंबनावर प्रतिक्रिया

एवढ्या मोठ्या प्रमाणात खासदार निलंबित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. याचा अतिरेक होऊ नये, संसदेच बळ हे राजकीय बळ म्हणून भाजप वापरत आहे. संसदेचं बळ सामान्य माणसासाठी वापरले गेले पाहिजे. सगळ्यांना सरसकट निलंबित करणे म्हणजे उद्या तुमच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल, तसे करू नये, असं बच्चू कडू यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पहलगाममध्ये क्रूर दहशतवादी हल्ला: राहुल गांधी

Government App : ओला-उबरला झटका, सरकार अॅप लाँच करणार, सरनाईकांची माहिती

Aamir Khan: आमिर खानकडून चाहत्यांना गिफ्ट, फक्त १०० रुपयांत पाहायला मिळणार सर्व चित्रपट; कुठे आणि कसं?

Smartphone Tips: फोन सतत हॅंग होतोय? वापरा 'या' सोप्या टिप्स

Shocking : ड्युटीवर असताना डॉक्टर झोपला, उपचाराअभावी अपघातग्रस्ताचा मृत्यू, Video मुळे सरकारी रुग्णालयातलं सत्य बाहेर

SCROLL FOR NEXT