- चेतन व्यास
Wardha News : जिथे आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सचिव बसतात तिथेच सगळा गोंधळ आहे. खरंतर पाणी मंत्रालयातच मुरत आहे, तिथेच सगळी चिरीमिरी आहे. त्यामुळे मंत्रालयाचे सहा मजले जरी सुधराले तर अख्खा महाराष्ट्र सुधरेल असे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu Latest Marathi News) यांनी नमूद केले. यावेळी विविध दाखले देत आमदार कडू यांनी मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या कारभारावर टीका केली. (Maharashtra News)
दिव्यांगांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनाचा लाभ मिळण्यासाठी वर्धा येथील सेवाग्राम येथे दिव्यांगाच्या दारी अभियान राबविल्या जात आहे. या अभियानाची सुरुवात आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आली. आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांग बांधवांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
आमदार बच्चू कडू म्हणाले घर मोठी बांधण्यात काही अर्थ नाही. माणसं मोठे असले पाहिजे. नाहीतर एवढ्या मोठ्या सात मजली मंत्रालयात कालच एका अधिकाऱ्याला झापून आलोय. मंत्रालयाचे सहा मजले जरी सुधरले तर अख्खा महाराष्ट्र सुधरते पण पाणी मंत्रालयातच मुरते, तिथेच सगळी चिरीमिरी आहे.जिथे आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सचिव बसतात तिथेच सगळं गोंधळ आहे.
बदलीसाठी मंत्रालयात काय काय कराव लागते हे सगळ तुम्हाला माहित आहे, लय वांदे आहे. यात बदल आवश्यक आहे असंही बच्चू कडू यांनी नमूद केले.
दिव्यांग लाभार्थी शासकीय योजनेपासून वंचित राहणार नाही यासाठी जिल्हा प्रशासनाकडून दिव्यांगांच्या दारी अभियान राबविण्यात येत आहे. वर्धा जिल्ह्यातून शेकडो दिव्यांग बांधव या अभियानात सहभागी झाले आहेत. आज सकाळपासून दिव्यांग बांधवांनी या शिबिराच्या नोंदणीकरिता चांगलीच गर्दी केली.
या कार्यक्रमाला आमदार पंकज भोयर,जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे,समाजकल्याण अधिकारी प्रसाद कुलकर्णी यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित हाेते.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.