Bacchu Kadu, Raj Thackeray, Maharashtra Politics saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : 'जात, धर्म लावला तर सहज पक्ष वाढताे' राज ठाकरेंना टाेला (पाहा व्हिडिओ)

अमरावतीत बच्चू कडूंनी राज ठाकरेंवर ताेफ डागली.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

Maharashtra Politics : जात आणि धर्म लावला तर पक्ष वाढायला वेळ लागत नाही. मधल्या काळात मनसेने महाराष्ट्र माझा मी महाराष्ट्राचा हा स्लोगन देऊन तेरा आमदार निवडून आणले होते. पण ते तेराही आमदार महाराष्ट्र विसरून गेले अशी टिप्पणी आमदार बच्चू कडू (bacchu kadu) यांनी राज ठाकरे (raj thackeray) यांच्यावर केली आहे.

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील पिंपळखुटा येथे आयोजिलेल्या कार्यक्रमात आमदार बच्चू कडू यांनी भाषणात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. यावेळी माेठा जनसमुदाय उपस्थित हाेते. (Maharashtra News)

आमदार बच्चू कडू (bacchu kadu) म्हणाले पक्ष वाढायला जात आणि धर्म लावला तर वेळ लागत नाही. सहज पक्ष वाढताे. मधल्या काळात मनसेने (mns) महाराष्ट्र माझा मी महाराष्ट्राचा हा स्लोगन देऊन तेरा आमदार निवडून आणले होते. पण ते तेराही आमदार महाराष्ट्र विसरून गेले. सभेतून बोलण्याने मत मिळत नाही असा टाेला बच्चू कडू यांनी राज ठाकरेंवर लगावला. ते म्हणाले जनतेने बच्चू कडूला चार वेळा निवडून दिले पण कधी धर्माचा, जातीचा झेंडा लावला नाही. देशात इतिहास निर्माण केला जनतेने असंही त्यांनी आमदार कडूंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नागपूरच्या बारमध्येच शासकीय काम; उपविभागीय अभियंत्याची चौकशी सुरू

भाषेवरून लोकसभेतच गदारोळ, निशिकांत दुबेंचा 'हिंदी' हट्ट, पाहा काय घडलं? |VIDEO

Marathi School : आपुल्या घरात हाल सोसते...! मुंबईतील आणखी एक मराठी शाळा बंद होणार

Akola : अकोल्यातील जवान नितेश घाटे यांना अयोध्येत वीरमरण; कर्तव्यावर असताना दुर्दैवी घडलं

Pune Rave Party: नवऱ्याला वाचवण्यासाठी रोहिणी खडसेंनी अंगावर चढवला वकिलीचा कोट, कोर्टात नमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT