Bachchu Kadu Navneet Rana Saam tv
महाराष्ट्र

Amravati Lok Sabha: नवनीत राणांविरोधात आमदार बच्चू कडूंची मोठी खेळी; अमरावतीत काहीतरी मोठं घडणार

Amravati Politics News: आज शुक्रवारी दुपारी १ वाजता बच्चू कडू जाहीर पत्रकारपरिषद घेणार आहेत. या पत्रकारपरिषदेत ते नेमकी काय घोषणा करणार, याकडे महायुतीच्या नेत्यांसह अमरावतीकरांचं लक्ष लागून आहे.

Satish Daud

अमर घटारे, साम टीव्ही अमरावती

Bachu Kadu Vs Navneet Rana Amravati

खासदार नवनीत राणा यांना भाजपने अमरावतीमधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. उमेदवारी जाहीर होताच राणा यांनी भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला आहे. मात्र, त्यांच्या लोकसभा उमेदवारीला आमदार बच्चू कडू यांनी विरोध केला आहे. नवनीत राणा यांना निवडणुकीत पाडणार, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इतकंच नाही, तर नवनीत राणा यांच्याविरोधात आम्ही उमेदवार देऊ, असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. आज शुक्रवारी दुपारी १ वाजता बच्चू कडू (Bacchu Kadu) जाहीर पत्रकारपरिषद घेणार आहेत. या पत्रकारपरिषदेत ते नेमकी काय घोषणा करणार, याकडे महायुतीच्या नेत्यांसह अमरावतीकरांचं लक्ष लागून आहे.

नवनीत राणा यांना कोंडीत पकडण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी मोठी खेळी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाचे नेते दिनेश बूब आज प्रहार पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यानंतर दिनेश बुब हे प्रहार पक्षाकडून अमरावती लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढवणार, अशी माहिती देखील मिळत आहे.

दिनेश बूब अमरावती लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. महाविकास आघाडीकडून आपल्याला उमेदवारी मिळणार, अशी आशा बूब यांना होती. मात्र, ठाकरे गटाने त्यांना तिकीट नाकारलं. त्यामुळे नाराज असलेले दिनेश बूब आज प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

दिनेश बूब यांची अमरावतीमध्ये मोठी ताकद आहे. त्यांनी बच्चू कडू यांच्या पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरल्यास नवनीत राणा यांची मोठी अडचण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, चांगल्या उमेदवाराला पाठिंबा देऊन नवनीत राणा यांना पाडता येते का? हे आम्ही पाहणार आहोत, असेही बच्चू कडू म्हणाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

Kashmera Shah Accident: कृष्णा अभिषेकच्या पत्नीचा परदेशात झाला भीषण अपघात, फोटो शेअर करत म्हणाली, जखमांचे व्रण...

Maharashtra News Live Updates: शरद पवारांची सोशल मीडियावरून चेतन तुपेंवर टीका

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

SCROLL FOR NEXT