Babanrao Lonikar Saam TV
महाराष्ट्र

Babanrao Lonikar: अ‍ॅट्रॉसिटी गुन्ह्याप्रकरणी लोणीकरांना अटकपूर्व जामीन मंजूर

भाजप (BJP) आमदार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांच्या विरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना: माजी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. महावितरण अधिकाऱ्याला फोन वरुन धमकी दिल्या प्रकरणी दाखल असलेल्य अ‍ॅट्रॉसिटी गुन्ह्याप्रकरणी त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे (Lonikar granted pre-arrest bail in atrocity case).

भाजप (BJP) आमदार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांच्या विरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी काँग्रेसच्या अनुसूचित विभागाच्या जिल्हाध्यक्षांनी तालुका जालना पोलिसांत त्याबाबतची तक्रार दिली होती.

नेमकं काय घडलं?

भाजपचे परतुरचे आमदार बबनराव लोणीकर यांनी त्यांच्या औरंगाबादमधील (Aurangabad) बंगल्याच्या थकीत वीज बिलाअभावी विजेचे मीटर इंजिनिअरने काढून नेले, म्हणून त्यांना शिवीगाळ केली होती. इंजिनिअरसोबत लोणीकरांच्या झालेल्या संभाषणात लोणीकर यांनी महावितरणमध्ये काम करणाऱ्या दलित कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली होती. तसेच, झोपडपट्टीतील लोकांच्या घरी जाऊन वीज कनेक्शन तोडा, असंही म्हटलं आहे.

त्यामुळे बबनराव लोणीकर यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार (Atrocity Act) गुन्हा दाखल करावा, अशा आशयाची तक्रार तालुका जालना पोलिसांत काँग्रेसच्या अनुसूचित विभागाचे जिल्हाध्यक्ष दिनकर घेवंदे यांनी दिली होती. गुन्हा दाखल न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील त्यांनी दिला होता. जालना पोलिसांनी या तक्रारीची दाखल घेत आमदार बबनराव लोणीकर यांच्या विरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता.

अटकपूर्व जामीन मंजूर

बबनराव लोणीकर यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने लोणीकरांना दिलासा देत त्यांचा जामीन मंजूर केला आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : पुण्यात थोड्याच वेळात होणार मतमोजणीला सुरुवात

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT