Jayant Patil News Saamtv
महाराष्ट्र

Santosh Bangar News: काढली का मिशी! जाहीर आव्हानाने संतोष बांगर यांची केली चांगलीच पंचाईत; राष्ट्रवादीने साधला निशाणा

Kalamnuri APMC Election Result: १७ पैकी १७ जागा जर निवडून नाही आल्या, तर हा संतोष बांगर मिशा ठेवणार नाही” असे आव्हान संतोष बांगर यांनी दिले होते.

Gangappa Pujari

Hingoli News: शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात. कधी अधिकाऱ्यांना मारहाण तर कधी फोनवर अश्लिल शिविगाळ सापडणारे संतोष बांगर आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. याला कारण ठरले ते त्यांनीच दिलेले एक चॅलेंज.

सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक निकालाची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणूकीत बांगर यांनी 17 पैकी 17 जागा आपण निवडणून आणू नाहीतर मिशा काढू असं चॅलेंज दिलं होतं. मात्र निकालानंतर शिवसेना- भाजप युतीचा दारुण पराभव झाल्याने आता संतोष बांगर यांची चांगलीच गोची झाली आहे. (Latest Marathi News)

अयोध्या पोळ यांनी डिवचले...

कळमनुरी बाजार समितीत (Kalmanuri APMC Election) भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला 5 जागा, तर महाविकास आघाडी 12 जागेवर विजयी झाली आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी यानंतर एकच जल्लोष केला आहे. तत्पुर्वी कळमनुरीत राष्ट्रवादी, उरलेली शिवसेना, काँग्रेस, वंचित हे सगळे एक झाले आहेत. पण आजही सांगतो, नागनाथाचं मंदिर समोर आहे. १७ पैकी १७ जागा जर निवडून नाही आल्या, तर हा संतोष बांगर मिशा ठेवणार नाही” असे आव्हान संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी दिले होते.

अयोध्या पोळ यांनी डिवचले....

त्यावरून ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ (Ayodhya Paul) यांनी बांगर यांना डिवचलं आहे. तसेच त्या चॅलेंजची आठवण करून देत आपण 20 रूपयं खर्च करून दाडी करायचं खोरं आणलं आहे. फक्त तुझ्यासाठी दादुड्या. कधी काढणार मिशा? काढ हा, म्हणत टोला लगावला आहे.

राष्ट्रवादीनेही लगावला टोला...

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही यावरुन संतोष बांगर यांची खिल्ली उडवली आहे. "काढली का मिशी त्यांनी (संतोष बांगर यांनी)? कालच गेलेत ते, काढतील मग ते मिशी. एकनाथ शिंदेंसोबत गेलेले लोक शब्दांचे पक्के असतात. मिशी काढली तर त्यांचा सत्कार करू आपण, अशी खरमरीत टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

IND vs ENG 2nd Test Score: शुबमनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; दुसऱ्या डावातही ठोकलं शतक

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

SCROLL FOR NEXT