Prakash Ambedkar On Aurangzeb Tomb: Saam Tv
महाराष्ट्र

Aurangzeb Tomb: 'औरंगजेबाची कबर, पुढची अयोध्या होणार'; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक आरोप

Prakash Ambedkar On Aurangzeb Tomb: औरंगजेबाच्या कबरीवरुन वाद पेटलाय. मात्र हा वाद दुसरी आयोध्या घडवण्यापर्यंत जाईल, असा दावा करण्यात आलाय.. मात्र हा दावा कुणी केलाय? राज्यात धार्मिक तेढ का निर्माण केली जात आहे? त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.

Bharat Mohalkar

खुल्ताबादमधील औरंगजेबाची कबरीवरुन राज्यात वाद पेटलाय. एवढंच नाही तर या वादावरून थेट मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये दंगल उसळलीय. त्यावर प्रकाश आंबेडकरांनी भाष्य करत औरंगजेबाची कबर पुढची अयोध्या होण्याचा खळबळजनक दावा केलाय.

राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर केंद्र सरकारच्या पुरातत्व खात्याचं संरक्षण असलेली औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी जोर धरु लागली. त्यातच विश्व हिंदू परिषदेने औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी कारसेवेचा इशारा दिला. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही औरंगजेबाची कबर हटवण्याची भूमिका घेतलीय.

राहत इंदोरींच्या शायरीचा आधार घेत नागपूर में तनाव है क्या, कुछ पता तो करो, सर पर चुनाव है क्या? असं म्हटलं जातंय. मात्र कुठलीही निवडणूक नसताना औरंगजेबावरुन वातावरण तापवण्यामागे पुढच्या लोकसभा निवडणुकीचं गणित असल्याचा दावा आंबेडकरांनी केलाय. त्यामुळे निवडणूका जिंकण्यासाठी लोकांचे संसार उध्वस्त केले जात आहेत का? याबरोबरच औरंगजेबाच्या कबरीचा वाद दुसरी आयोध्या होण्याइतका तापणार का? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात पावसाची रिपरिप; बळीराजा सुखावला

Maharashtra Politics: मद्य घोटाळ्याचा आर्थिक कणा शिंदेंच्या फाउंडेशनचा! संपूर्ण मंत्रीमंडळ बरखास्त करा – संजय राऊत|VIDEO

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना जुलै-ऑगस्टचा हप्ता एकत्र मिळणार? ३००० रुपये या दिवशी खात्यात जमा होण्याची शक्यता

Ruchi Gujjar: चित्रपटाच्या प्रिमियरमध्ये राडा; अभिनेत्रीने दिग्दर्शका-निर्मात्याला चप्पलने केली मारहाण, पाहा VIDEO

Palghar Schoking News : मरणानंतरही यातना संपेना! भर पावसात उघड्यावर अंत्यसंस्कार, पालघरमधील भयान वास्तव

SCROLL FOR NEXT