TET Scame News Saam TV
महाराष्ट्र

TET Scam : टीईटी घोटाळ्यातील शिक्षकांना दिलासा; कोर्टाने दिला मोठा निर्णय

या निर्णयामुळे टीईटी घोटाळ्यातील शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

डॉ. माधव सावरगावे

TET Scame News : टीईटी घोटाळ्यातील (TET Scam) शिक्षकांचे पगार थांबवू नका. त्यांचं वेतनवाढ थांबवू शकता, पण पगार नाही. असे निर्देश औरंगाबाद (Aurangabad) खंडपीठाने शिक्षण विभागाला दिले आहेत. औरंगाबाद खंडपीठाच्या या निर्णयामुळे टीईटी घोटाळ्यातील शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. (TET Scam Maharashtra)

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने टीईटी घोटाळ्यासंबंधी ७ हजार ८८० शिक्षकांवर (Teacher) कारवाई केली होती. त्यानंतर शिक्षण विभागाने या प्रकरणाशी संबंधित असलेल्या शिक्षकांचे वेतन थांबविले होते. याप्रकरणी हिंगोली जिल्ह्यातील तीन शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.

याचिकेत काय म्हटलं होतं?

टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक नसल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले होतं. प्राथमिक शिक्षकांसाठी एक ते आठ वर्गापर्यंत प्रवेश पात्रता परीक्षा लागू असल्याचे म्हटले आहे. शासनाचा २८ मार्च २०१३ चा निर्णय उपलब्ध असून या शिक्षकांना अनुदान तत्त्वावर वेतन दिले जाते. त्यांच्या नियुक्त्या शिक्षणाधिकारी यांनी मान्य केल्या असल्याचे म्हटले आहे. अशावेळी यांच्याविरुद्ध सुनावणीची संधी न देता एकतर्फी कारवाई करणे योग्य नसल्याचे याचिकेत म्हटले आहे. (TET Scam Latest News)

दरम्यान, राज्य शासनाच्या आदेशाविरोधात दाखल केलेल्या या याचिकेवर आज सुनावणी झाली. या सुनावणीत खंडपीठाने टीईटी घोटाळ्यातील शिक्षकांचे पगार थांबवू नका. त्यांचं वेतनवाढ थांबवू शकता, पण पगार नाही. असे निर्देश औरंगाबाद खंडपीठाने शिक्षण विभागाला दिले आहेत. खंडपीठाच्या या निर्णयामुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Death: सिनेसृष्टीचा तेजस्वी तारा हरपला, ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

SCROLL FOR NEXT