Jayant Patil : ...तर धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरेंकडेच; जयंत पाटील काय म्हणाले, वाचा...

एकनाथ शिंदे हे आपल्या गटातील आमदारांची निवडणूक आयोगासमोर ओळख परेड करणार आहेत.
Jayant Patil
Jayant Patil Saam TV
Published On

हिंगोली : शिवसेना नेमकी कुणाची? हा निर्णय आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या गटातील आमदारांची निवडणूक आयोगासमोर ओळख परेड करणार आहेत. एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत असलेल्या सर्व आमदारांना घेऊन दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगापुढे येणार आहेत. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह (Shivsena) नेमकं कुणाला मिळणार अशी चर्चा सुरू झाली आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मत व्यक्त केलंय. (Jayant Patil News Today)

Jayant Patil
CM एकनाथ शिंदेंसह गटाचे आमदार दिल्ली दौऱ्यावर; महाराष्ट्र सदनातील ४५ खोल्या बुक

राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) हे आज हिंगोली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार असा प्रश्न पत्रकारांनी जयंत पाटलांना विचारला. यावर उत्तर देताना, 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह हायजॅक करण्याचे प्रयत्न शिवसेना पक्षामधून फुटून गेलेले लोक करत आहेत, मात्र निवडणूक आयोगावर कुणाचा प्रभाव नसेल तर शिवसेना पक्ष आणि चिन्ह उध्दव ठाकरे यांच्या कडेच राहील' असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचं याबाबत निवडणूक आयोगात ठाकरे-शिंदे गटात (Ekntah Shinde) वाद सुरू आहे. निवडणूक आयोगासमोर जाऊन एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत असलेले आमदार दाखवणार आहेत. हे आमदार दाखवून एकनाथ शिंदे शिवसेना आणि धनुष्यबाण या चिन्हावर आपला हक्क असल्याचं सांगणार आहेत. (Mumbai Shivsena News Today)

Jayant Patil
Vedanta : 'वेदांता'साठी 'मविआ' ने पैसे मागितले? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

शिवसेना कुणाची? धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळणार? यावरून सध्या निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. सुप्रीम कोर्टाने यासाठी घटनापीठाचीही स्थापना केली आहे. दुसरीकडे महापालिका निवडणुका तोंडावर आल्या असताना एकनाथ शिंदे यांनी आमदारांची ओळख परेड करण्याची रणनिती आखली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत धनुष्यबाण चिन्ह आपल्याकडेच राहावं असा प्रयत्न शिंदे गटाचा आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com