Aurangabad Crime
Aurangabad Crime माधव सावरगावे
महाराष्ट्र

पोलिस आयुक्तालयासमोर तुफान हाणामारी

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद: औरंगाबादच्या (Aurangabad) पोलिस आयुक्तालयासमोरच (commissionerate) गुरुवारी रात्री दोन गटांमध्ये तुफान हाणामारी (fighting) झाली. हाणामारी सुरू असताना पोलिस (police) पोहचल्यानं राडा करणाऱ्यांनी पळ काढला आहे. मात्र, पोलीस (police) आयुक्तालयासमोरच राडा झाल्यानं पोलिसांची भीती राहिली नाही का, याची सध्या चर्चा सुरू झाली आहे. तरुणांच्या टोळक्यात होणारा राडा औरंगाबाद (Aurangabad) शहरासाठी काही नवीन नाही, पण गुरुवारी रात्री दोन गट थेट पोलिस (police) आयुक्तालयासमोरच भिडले होते. तुफान राडा करणाऱ्या तरुणांमध्ये पोलिस वेळीच घुसल्याने पुढील अनर्थ टळला.

हे देखील पाहा-

पोलिसांनी काहींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. मात्र, हे टोळके एकमेकांना का भिडले अद्याप समोर आले नाही. गुरुवारी रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास १५ ते २० जणांचे दोन गट मिल कॉर्नरजवळील पोलिस आयुक्तालयासमोर समोरा- समोर आले. सुरुवातीला बाचाबाची सुरू असलेले हे गट शिवीगाळ सुरू करताच थेट मारहाणीला भिडले. त्यांच्यात तुफान हाणामारी सुरू झाली. एकमेकांना हाताचापटाने मारहाण सुरू असताना काहींना जमिनीवर पाडून पायाखाली तुडविले. दोन्ही गटाकडील तरुण जमा झाले. बघ्यांची गर्दी झाल्याने पन्नासच्यावर जमाव आयुक्तालयासमोर गोळा झाला.

या घटनेची माहिती आयुक्तालयात हजर अधिकाऱ्यांना कळताच ते कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. पोलीस येत असल्याचे पाहून अनेकांनी पळ काढला. तर काही तरुणांना मात्र पोलिसांनी तत्काळ पकडून ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत कारवाईची प्रक्रिया सुरू होती. भांडणाचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CSK vs PBKS : पंजाबने चेन्नईला सलग चौथ्यांदा नमवलं; पंजाबचा ७ गडी राखून विजय

Petrol-Diesel : या राज्यात केवळ ५०० रुपयांपर्यंतचं भरता येणार पेट्रोल-डिझेल

Rupali Ganguly: परी म्हणू की अप्सरा; रूपालीचे आउटफिट पाहून पडाल प्रेमात

Health Tips : डाएट आणि जीम न करता वजन कमी करायची इच्छा आहे? फक्त ६ टिप्स फॉलो करा

Carrot Juice: रोज सकाळी प्या गाजराचा रस, निरोगी राहाल

SCROLL FOR NEXT