Aurangabad News
Aurangabad News Saam Tv
महाराष्ट्र

Aurangabad News : हृदयद्रावक! औरंगाबादेत शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवनीत तापडिया

Aurangabad Farmer News : औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका शेतकरी दाम्पत्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना आहे.

ही घटना औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यातील धावडा येथे घडली. सुरेखा दळवी आणि संतोष दळवी अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. शेतकरी दाम्पत्याच्या आत्महत्येच्या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पत्नीने सोमवारी (२० फेब्रुवारी) सकाळी विषारी किटक औषध प्राशन करून आत्महत्या केली. तर पतीने बुधवारी (२१ फेब्रुवारी रात्री झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. सततची नापिकता, विविध बँकेचे कर्ज,अशा आर्थिक विवंचनेतुन शेतकरी दामपत्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी सिल्लोड (Aurangabad) ग्रामीण पोलीस (police) ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

आर्थिक विवंचना आणि नैराश्यातून पत्नीने सोमवारी विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यानंतर कर्जबाजारीपणा आणि पत्नीच्या विरहातून बुधवारी पतीने देखील गळफास घेऊन आपले जीवन संपविल्याची माहिती आहे. या घटनेमुळे दोन मुले आणि दोन मुली पोरकी झाली आहेत.

महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, बुधवारी सकाळी संतोष दळवी यांचा मृतदेह स्वतः च्या शेतातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

त्यांना ग्रामस्थांनी तातडीने सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात आणले. तेथील डॉक्टरांनी तपासून मृत असल्याचे घोषित केले. बुधवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास संतोष यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंकार करण्यात आले. या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेनं  परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arshad Khan: हार्दिक पंड्याला आणखी एक पर्यायी ऑलराउंडर सापडला? कोण आहे अरशद खान?

Today's Marathi News Live : शरद पवार नाशिकला पोहोचले, हेलीकॉप्टरने आगमन

IPL 2024 Playoffs Prediction: लिहून घ्या! हेच ४ संघ करणार IPL 2024 च्या प्लेऑफमध्ये प्रवेश

Weight Loss Tips: खाण्यापिण्याच्या 'या' सवयी पाळा, आठवडाभरात वजन होईल कमी

Char Dham Yatra 2024: चारधामला जाणाऱ्या रस्त्यावर ट्रॉफिक जाम; ६ भाविकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT