CM Eknath Shinde In Aurangabad Saam TV
महाराष्ट्र

Sambhaji Nagar: औरंगाबादकरांना एक दिवसाआड पाणी मिळणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

CM Eknath Shinde Latest News |औरंगाबादची पाण्याची जुनी योजना जुन्या पाईपलाईनसाठी 200 कोटींचा निधी देण्यात येणार आहे असल्याची घोषणा त्यांनी केली.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद: मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज, रविवारी ते त्यांनी औरंगबादमध्ये (Aurangabad) पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. औरंगाबादच्या पाणीप्रश्नावरही त्यांनी मोठी घोषणा केली आहे. औरंगाबादची पाण्याची जुनी योजना जुन्या पाईपलाईनसाठी 200 कोटींचा निधी देण्यात येणार आहे असल्याची घोषणा त्यांनी केली. (CM Ekanth Shidne Latest News)

हे देखील पाहा -

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अतिवृष्टी नुकसानीचा आढावा घेतला, पंचनामे, मदतीचा आढावा घेतला. पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषानुसार मदत आहे, पण ही मदत कमी असल्याने राज्य सरकार आपल्या परिने पूर्ण मदत करणार, सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले.

सोबतच क्रीडा विद्यापीठ औरंगाबादला स्थापन करण्यात येणार आहे. 100 कोटी रुपये खर्च करून समृद्धी ते औरंगाबाद व्हाया पडेगाव रस्ता तयार करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झाल्या पाहिजेत अंस मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. त्याचप्रमाणे हिंगोलीच्या कुरुंदा गावाच्या अडचणी सोडवल्या जातील, बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा आढावा घेतला आणि या स्मारकाचं काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, प्रत्येक शेतकऱ्याचा जीव महत्वाचा आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. शेतकऱ्यांना बॅंकांनी तातडीने कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. याचसोबत परभणीतली समांतर पाणीपुरवठा योजनादेखील कार्यान्वीत होईल. तसेच नांदेडमधील भूमीगत गटार योजना पूर्ण करु. घाटी रुग्णालयाचं खासगीकरण होणार नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

कॉमनवेल्थमध्ये रौप्य पदक जिकंणाऱ्या सागर सलगर या खेळाडूला ३० लाखांच्या पारितोषकाची घोषणा त्यांनी यावेळी केली. त्याचप्रमाणे समुद्रात पाहून जाणारं पाणी हे मराठवाड्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. या निर्णयामुळे मोठी जमीन ओलीताखाली येणार आहे. यासाठी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्याला आश्वासन दिलं असल्याचंही एकनाथ शिंदे म्हणाले. सोबचत केंद्र आणि राज्याच्या योजना या एकत्र राबवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांबाबतही त्यांनी मोठी घोषणा केली आहे. ते, म्हणाले खड्डे शोधून सापडले नाही पाहिजे असे काम करणार आहोत. मुंबईतले सगळे रस्ते सिमेंट काँक्रिटचे होतील, जे मी आज बोललो आहे त्याची अंमलबजावणी होणार आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen tips: हात खराब न करता चपातीचं पीठ कसं भिजवाल? पाहा एक सोपा देसी जुगाड

Ram-Leela Movie: रामलीला चित्रपटासाठी दीपिका पदुकोण नव्हती पहिली पसंती; तर या प्रसिद्ध अभिनेत्रीला  करण्यात आला होता रोल ऑफर...

Bajarang Sonawane : बीड जिल्ह्यात लोकसभेची पुनरावृत्ती निश्चित; खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला विश्वास

Bank Job: इंडियन बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; या पदासाठी भरती सुरु, पगार किती? जाणून घ्या

VIDEO : खासदार प्रणिती शिंदे आणि आमदार कल्याणशेट्टी यांच्यात वाकयुद्ध | Marathi News

SCROLL FOR NEXT