Sudhir Mungatiwar saam tv
महाराष्ट्र

Aurangabad Renaming : औरंगाबादच्या नामांतरावर सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, 'औरंगाजेब अत्याचारी...

औरंगाबाद शहराच्या नामकरणावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपती संभाजीनगर आणि धाराशीव नामांतरानंतर अत्यंत आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

संजय तुमराम

चंद्रपूर : केंद्र सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराला शुक्रवारी (२४ फेब्रुवारी) मंजुरी दिली. त्यामुळे लवकरच औरंगाबादचं नाव आता छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचं नाव धाराशिव ठेवलं जाणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाचं सर्वच राजकीय स्तरातून कौतुक केलं जात आहे. औरंगाबाद शहराच्या नामकरणावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपती संभाजीनगर आणि धाराशीव नामांतरानंतर अत्यंत आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. (Latest Marathi News)

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी छत्रपती संभाजीनगर आणि धाराशीव नामांतरावर भाष्य केलं. 'औरंगजेब अत्याचारी होता. त्याचे नाव शहराला हवेच कशाला असा सवाल त्यांनी केला. आमच्या विधानसभेतील प्रयत्नांना केंद्र सरकारने मान्यता दिल्याचे समाधान आहे, असे मुनगंटवार म्हणाले.

'जून महिन्यापासून शिवराज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने वर्षभर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. याच दरम्यान भवानी तलवार आणि वाघनखे देखील किमान वर्षभरासाठी आपल्याकडे येण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. नामबदल म्हणजे चैतन्य असल्याचे सांगत आपला इतिहास विकास धर्माचा असून शंभूराजांचा गौरव झाला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्या औरंगाबादच्या नामांतरावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना प्रश्न केला. त्यावर फडणवीस यांनी ट्विट करत स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे.

'अंबादास जी, आधी पूर्ण प्रक्रिया समजून घ्या. केंद्र सरकारची मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली की, आधी सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना काढते, तेव्हा शहरांची नावे बदलतात. ही अधिसूचना जारी झाली आहे, त्यानुसार औरंगाबादचे 'छत्रपती संभाजीनगर' आणि उस्मानाबादचे 'धाराशिव' असे नामकरण झाले आहे, असं ट्विट फडणवीसांनी केलं आहे.

महसूल व वन विभाग तसेच नगरविकास विभाग अधिसूचना जारी करेल, तेव्हा संपूर्ण जिल्ह्याचे, तालुक्याचे, महापालिका आणि नगरपालिकेचे सुद्धा नाव बदलेल. दोन्ही जिल्ह्यांसंदर्भात याचीही प्रक्रिया सुरू झाली आहे. आम्ही जेव्हा काही करतो तेव्हा ते पूर्णच करतो. अर्धवट काहीच ठेवत नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ५ दिवस पुन्हा अवकाळी, उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ८ दिवसात खुशखबर मिळणार? ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

Phaltan Female Doctor Case: महिला डॉक्टरवर बीडमध्ये अंत्यसंस्कार, आई-बापाचा काळीज चिरणारा आक्रोश | VIDEO

Mangal Gochar 2025: 27 ऑक्टोबरपासून 'या' राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम; मंगळ ग्रह करणार स्वतःच्याच राशीत प्रवेश

Success Story: जर्मनीतील नोकरी सोडली, भारतात रिसेप्शन म्हणून काम केले, दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक, IPS पूजा यादव यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT