Aurangabad Murder News नवनीत तापडिया
महाराष्ट्र

Aurangabad Crime: ऐन दिवाळीत झालेल्या खुनाचा पर्दाफाश; पोलिसांनी 72 तासांत लावला गुन्ह्याचा छडा

Aurangabad Crime News: मोंढानाका परिसरातील एका गोडाऊनमध्ये कामाला असणाऱ्या एका सुरक्षारक्षकाची निर्घुण हत्या करण्यात आली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवनीत तापडिया, औरंगाबाद

Aurangabad Crime News: ऐन दिवाळीत औरंगाबाद शहरात एका सुरक्षारक्षकाची हत्या झाली होती. मोंढानाका परिसरातील एका गोडाऊनमध्ये कामाला असणाऱ्या एका सुरक्षारक्षकाची निर्घुण हत्या करण्यात आली होती. चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी ही हत्या केली होती. त्यानंतर औरंगाबाद (Aurangabad) शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 72 तासांत या हत्येचा छडा लावत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. (Aurangabad Murder News)

या हत्येच्या तपासासाठी पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली. पोलिसांनी 275 पेक्षा जास्त वाहनाची तपासणी करत 950 पेक्षा अधिक CCTV कॅमेरे तपासून तब्बल 800 किमी प्रवास केला आणि मुंबईतून आरोपींना अटक केली आहे. यासाठी औरंगाबाद शहर पोलीसांच्या गुन्हे शाखेला मुंबई, मीरा भाईंदर आणि धुळे पोलिसांचीदेखील मदत मिळाली.

याप्रकरणी पोलिसांनी सलीम अहमद जब्बार अहमद अन्सारी, मुबारक अली बिलाल अली या दोघांना मुंबई येथून ताब्यात घेतले तर मोहम्मद इब्राहिम मोहम्मद चौधरी याला धुळे येथून ताब्यात घेतले. या तिघांकडून चोरी केलेला 3 लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Disha Patani House Firing Case : धाड धाड धाड...! दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोघांचा पोलिसांकडून एन्काऊंटर

महसूल अधिकाऱ्यांच्या धमकीनंतर शेतकऱ्याची विहिरीत उडी; आत्महत्येने खळबळ

Marathwada Farmers Devastated: मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा आक्रोश; अतिवृष्टीने बळीराजा हवालदिल,ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी तीव्र

मीनाताई ठाकरे पुतळा विटंबना प्रकरण; पुतळ्यावर लाल रंग फेकणाऱ्याला अटक

Thursday Horoscope : मनस्ताप वाढवणार, हातून चुका घडणार; 'या' राशीच्या लोकांना अडचणीचा काळ टाळून पुढे जावे लागणार

SCROLL FOR NEXT