Pankaja Munde SaamTV
महाराष्ट्र

पंकजा मुंडे यांचे समर्थक पुन्हा आक्रमक; भाजप मंत्र्याच्या कार्यालयावर दगडफेकीचा प्रयत्न

पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने हा वाद मिटला

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद: विधान परिषद निवडणुकीसाठी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना डावलण्यात आल्यामुळे भाजपमधील (BJP) अंतर्गत धुसफूस वाढली आहे. राज्यात ठिकठिकाणी पंकजा मुंडे यांचे समर्थक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. पंकजा यांच्या समर्थकांनी विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांची ताफा अडवल्याची घटना ताजी असतानाच, आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. (Pankaja Munde Latest News)

पंकजा यांच्या समर्थकांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांच्या औरंगाबाद येथील कार्यालयावर दगडफेकीचा प्रयत्न केला आहे. या संपूर्ण प्रकारानंतर भाजप कार्यकर्ते देखील आक्रमक झाले. त्यामुळे औरंगाबादेत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने हा वाद मिटला. हा संपूर्ण प्रकार रविवारी (13 जून) सायंकाळच्या सुमारास घडला.

विशेष म्हणजे पंकजा यांचे विधानपरिषदेतून नाव डावलण्यात आल्याने काही दिवसांपूर्वी अहमदनगरमधील त्यांच्या एका समर्थकाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर रविवारी बीड जिल्ह्यात विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला गेला.

दरम्यान, रविवारी सायंकाळच्या सुमारास भाजप नेते भागवत कराड यांच्या औरंगाबादेतील कार्यालयाबाहेर पंकजा यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत दगडफेक केली. त्यानंतर भाजप कार्यकर्तेही आक्रमक झाले. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सदरील घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वेळीच हस्तक्षेप केल्याने वाद टळला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer progression: शरीरात कशी होऊ लागते कॅन्सरची सुरुवात? प्रत्येक कॅन्सरच्या स्टेजमध्य रूग्णाच्या शरीरात कसे होतात बदल?

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट

Nagpur University : शिक्षणाच्या आयचा घो! परीक्षेत पैकीच्या पैकी गुण तरीही गुणपत्रिकेत 'नापास'; नागपूरातील ढोबळ कारभार

KBC 17: कौन बनेगा करोडपती सीझन १७चा पहिला करोडपती; ७ कोटींच्या कोणत्या प्रश्नाचे दिले उत्तर?

First Metro: जगातील पहिली मेट्रो कधी आणि कुठे सुरू झाली? जाणून घ्या रंजक इतिहास

SCROLL FOR NEXT