Aurangabad News Saam TV
महाराष्ट्र

पालकमंत्र्याच्या दातांवर उपचार करताना झाली बत्ती गुल अन् ५ वर्षांपूर्वीचा 'तो' प्रस्ताव आला उजेडात

औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांना बत्ती गुलचा जबरदस्त शॉक बसला आहे.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्याचे (Aurangabad District) पालकमंत्री संदीपान भुमरे यांना बत्ती गुलचा जबरदस्त शॉक बसला आहे. शासकीय दंत रुग्णालयात (Government Dental Hospital) काल सायंकाळी त्यांच्या दातांवर उपचार सुरू असतानाच अचानक वीज गेली होती.

पालकमंत्र्यांवर उपचार करत असताना अचानक गेलेल्या लाईटमुळे डॉक्टरांसह अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली होती. शिवाय कक्षात अंधार पडल्याने पालकमंत्र्यांनी संताप व्यक्त केला. उपचार करणाऱ्या डॉक्टरांना तर काहीच सुचत नव्हते. यावेळी भुमरे (Sandipan Bhumre) यांचे स्वीय साहाय्यक यांनी कक्षात धाव घेतली आणि शेवटी सर्वांच्या मोबाइलच्या उजेडात भुमरे यांच्यावर उपचार करण्यात आले.

पाहा व्हिडीओ -

पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या दातावर उपचार करताना लाईट गेल्याने घाटी रुग्णालयाला (Ghati Hospital) मात्र फायदा झाला आहे. कारण या रुग्णालयासाठी पाच वर्षांपूर्वी 10 विभागांना जनरेटर मिळण्यासाठी 45 लाखांचा प्रस्ताव देण्यात आला होता मात्र, त्याकडे आजपर्यंत दुर्लक्ष करण्यात आलं होतं. पण भुमरे यांच्यावर उपचार करताना गेलेल्या लाईटमुळे आता रुग्णालयाला जनरेटर मिळणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ऑपरेशनवेळेस अशी अडचण येऊ नये म्हणून पाच वर्षांपूर्वीच घाटीच्या दहा विभागांसाठी ४५ लाख रुपयांचा प्रस्ताव दिला होता. मात्र, कोणीही त्याची दखल घेतली नव्हती. मात्र आता खुद्द पालकमंत्र्यांच्या दातांवर रुट कॅनॉल करताना अचानक वीज गेल्यामुळे रुग्णालयाच्या वीजेचा प्रश्न उजेडाच आला आहे.

शिवाय रुग्णालयाची ही अवस्था पाहून त्यांनी कोरोना (Corona) सेंटरमधील जनरेटर देण्याच्या सूचना केल्या असून दंत महाविद्यालयाने सर्व दहा विभागांसाठी ४५ लाख रुपयांच्या जनरेटरचा प्रस्ताव पाठवलेला असून आता तो मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींना गैरसोय झाल्यावरच प्रस्ताव मार्गी लागणार का असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nepali celebrities: मनीषा कोइरालापासून सुनील थापापर्यंत, या नेपाळी सेलिब्रिटींनी मनोरंजन विश्वातून जिंकली चाहत्यांची मनं

Fever: वारंवार ताप येणे 'हे' कोणत्या आजारांचे लक्षण आहे?

Pune Crime : विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा विनयभंग; पोलिसांकडून मोठी कारवाई, ढोल ताशा पथकातील दोघांना अटक

Police Roles: राणी मुखर्जीपासून अजय देवगणपर्यंत, 'या' कलाकारांनी पडद्यावर साकारली पोलिसांची दमदार भूमिका

Skin Care: वयाच्या चाळीशीतही तरुण दिसायचं, तर घरच्या घरी करुन लावा ही पेस्ट, आठवड्याभरात दिसेल फरक

SCROLL FOR NEXT