Aurangabad Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Aurangabad Crime : महिलेने उचलले टोकाचे पाऊल, नवऱ्याने चिठ्ठी वाचताच धक्कादायक कारण आलं समोर

मृत्यूपूर्वी लिहिलेली दोन पानी चिठ्ठी पतीच्या हाती

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवनीत तापडिया

Aurangabad Crime News - औरंगाबाद येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुपरवायझरच्या जाचाला कंटाळून विवाहितीने आत्महत्या केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. वाळूज परिसरातील वडगाव कोल्हाटी येथील विवाहित महिलेने कंपनीत काम करत असताना सुपरवायझरच्या होणाऱ्या सततच्या जाचाला कंटाळून विष प्राशन केलं होत. ही घटना मागच्या तीन दिवसांपूर्वी (दि.07) रोजी घडली होती.

आत्महत्या करण्यापूर्वी महिलेने एका चिठ्ठीत सुपरवायझरच्या जाचाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव कोल्हाटी येथील विवाहित महिले शनिवारी सुपरवायझरच्या जाचाला कंटाळून विष प्राशन केलं होत. त्यानंतर महिलेला तात्काळ माणिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

परंतु महिलेची तब्येत खालवल्यामुळे तिला पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालय घाटी येथे रवाना करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान महिलेचा सायंकाळी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पतीला पत्नीच्या मिळालेल्या चिठ्ठीवरून रेमंड कंज्युमर केअर कंपनीचा सुपरवायझरविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आता पोलीस पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्रात भारताला नंबर वन बनवण्याचे लक्ष्य

oil free puri : टम्म फुगलेल्या पुऱ्या बनवण्याची अचूक पद्धत; खाताना हाताला लागणार नाही एक थेंबही तेल

Maharashtra Politics: अजित पवार गटाचा शिवसेनेला जोरदार धक्का; २००पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Mumbai : एका दिवसात मुंबई दर्शन! 'ही' ७ ठिकाणं पाहिलीत तर दिवस बनेल खास

भर मंडपात नवरदेवासह नातेवाईकांना डिझेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न! प्रेमविवाहाचा असा बदला पाहून हादरून जाईल मन

SCROLL FOR NEXT