Aurangabad News Saam tv
महाराष्ट्र

Gram Panchayat Election: औरंगाबाद जिल्ह्यात शिंदे गटाचे वर्चस्व; शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांना झटका

औरंगाबाद जिल्ह्यात शिंदे गटाचे वर्चस्व; शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांना झटका

साम टिव्ही ब्युरो

औरंगाबाद : जिल्ह्यातील 16 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. यानंतर आज झालेल्या मतमोजणीत जनतेने मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या भुमिकेला समर्थन दिल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील 16 पैकी तब्बल 12 ग्रामपंचायतींवर शिंदे गटातील आमदारांचे पॅनल विजयी झाले आहेत. तर मुळ (Shiv Sena) शिवसेनेना 2 ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवता आली. (Aurangabad News Gram Panchayat Election)

औरंगाबाद (Aurangabad) जिल्‍ह्यातील १६ ग्रामपंचायतींसाठी झालेल्‍या मतदान प्रक्रीयेत आजच्‍या मतमोजणीत चित्र स्‍पष्‍ट झाले आहे. यात ग्रामपंचायतींवर शिंदे गटातील आमदारांचे निर्विवाद वर्चस्‍व राहिले आहे. यात लक्ष लागलेल्या प्रतिष्ठेच्या वडगाव कोल्हाटी बजाजनगर ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्या पॅनलचे 17 पैकी 11 उमेदवार विजयी झाले आहेत. यामुळे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि आमदार अंबादास दानवे यांना चांगलाच धक्का बसला आहे. तर पैठण तालुक्यात संदिपान भुमरे यांनी आपले वर्चस्व सिद्ध करत 7 पैकी 6 ग्रामपंचायतींवर आपल्या पॅनलचा झेंडा फडकावला आहे. सिल्लोड तालुक्यात देखील आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या पॅनलची 3 पैकी 2 ग्रामपंचायतींवर सत्ता आल्याने सिल्लोड तालुक्यात अब्दुल सत्तार यांचे वर्चस्व कायम असल्याचे दिसून आले आहे.

भाजपसह राष्‍ट्रवादी, कॉंग्रेसला बहुमत नाहीच

औरंगाबाद जिल्‍ह्यातील १६ ग्रामपंचायतीपैकी १२ ग्रामपंचायतींवर शिंदे गटाचे वर्चस्‍व राहिले आहे. तर मुळ शिवसेनेला दोन ग्रामपंचायतींवर वर्चस्‍व राखता आले आहे. मात्र जिल्ह्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला एकाही ग्रामपंचायतीमध्ये बहुमत मिळालेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jayant Patil : निवडणुकीची पद्धत बदलली, आमिषाला बळी पडू नका; जयंत पाटील यांचा निशाणा

Yashomati Thakur : मला ब्लॅक करतोय, २५ लाखांची मागणी; यशोमती ठाकूरांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यावर खळबळजनक आरोप

Delhi Politics : दिल्लीत 'आप'ला मोठा झटका; बड्या नेत्याने मंत्रिपद सोडलं, पक्षाचा राजीनामाही दिला

Maharashtra News Live Updates: नाशिकमध्ये मनसेला आणखी एक धक्का

Health Tip: मनूका कोणत्या व्यक्तींनी खावू नये ?

SCROLL FOR NEXT