Aurangabad Crime Saam tv
महाराष्ट्र

Aurangabad Crime: संतापजनक..जन्मदात्या बापाने दिले चिमुकलीला चटके; पत्नी सोडून गेल्याने मुलीवर काढायचा राग

संतापजनक..जन्मदात्या बापाने दिले चिमुकलीला चटके; पत्नी सोडून गेल्याने मुलीवर काढायचा राग

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापडिया

छत्रपती संभाजीनगर : धुनी- भांडी, फरशी पुसणे, झाडलोट ही कामे करायला लावायचा. इतकेच नाही तर १३ वर्षीय पोटच्या मुलीला जन्मदात्या बापानेच माचीसच्या काडीने चटके देऊन गंभीर जखमी केल्याची (Aurangabad News) संतापजनक घटना शहरातील संजयनगर, बायजीपुरा येथे उघडकीस आलीय. (Letest Marathi News)

मोहसीन अल अमोदी सईद अमर अमोदी असे आरोपी बापाचे नाव आहे. मोहसीन याने मुलीला मारहाण करून माचीसच्या काडीने हातापायावर, गालावर चटके (Crime News) देऊन गंभीर जखमी केले. याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलीची आई दुसरे लग्न करून निघून गेली. यामुळे मुलगी वडिलांसोबत राहते. सुरुवातीला ती आत्याच्या घरी राहिली; यानंतर वडिलांकडे आली.

किरकोळ कारणावरून मुलीला मारहाण

बाजूलाच तिचे आजी राहते आणि वडील पायाने अपंग आहेत. आजीकडे जेवण करून ती वडिलांचाही डबा घेऊन येत होती. तसेच घरातील लहान सहान कामे करत होती. त्यातच किरकोळ कारणावरून वडिलांनी मुलीला मारहाण करून चटके दिले. यामुळे मुलगी आरडाओरडा करू लागली. याबाबत शेजारच्यांना कळताच त्‍यांनी पोलिसांना बोलावले आणि पीडित मुलीच्या जबावावरून वडिलांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपी पसार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sameer Wankhede: 'मला पाकिस्तान आणि बांगलादेशकडून धमकीचे मेसेज...' समीर वानखेडेंचा दावा

Bhaubeej Gifts : कपडे- ज्वेलरी नाही; यंदा भाऊबीजेला लाडक्या बहिणीला द्या 'या' भन्नाट भेटवस्तू

Maharashtra Live News Update : महिलांच्या खात्यात १०,००० जमा करा- उद्धव ठाकरेंची मागणी

Pakistan Terror Attack : पोलीस प्रशिक्षण केंद्रावर दहशतवादी हल्ला; ७ पोलिसांचा जागीच मृत्यू, १३ जखमी

BMW Car Sales: BMW आवडे आम्हाला! ३ महिन्यांत कारच्या मागणीत २१%नी वाढ

SCROLL FOR NEXT