नवनीत तापडिया -
औरंगाबाद : दिवाळीनिमित्त (Diwali) होणारी प्रवाशांची वाढती गर्दी आणि उत्तर भारतासाठी मराठवाड्याहून थेट कनेक्टिव्हिटी मिळावी यासाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या (South Central Railway) वतीने जालना ते छपरा दरम्यान साप्ताहिक विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे.
आज 26 ऑक्टोबर रोजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) हे जालना रेल्वे स्थानकावरुन या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करणार आहेत. दक्षिण मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार 07651/ 07652 - जालना-छपरा-जालना विशेष रेल्वे दर बुधवारी रात्री 11:30 ला सुटेल तर औरंगाबाद येथून मध्यरात्री 12:20 ला सुटून शुक्रवारी सकाळी 5:30 ला छपरा येथे पोहोचेल. (Weekly special train between Jalna to Chhapra)
पाहा व्हिडीओ -
तसंच परतीच्या प्रवासात ही गाडी छपरा येथून दर शुक्रवारी रात्री 10:15 ला सुटून औरंगाबाद येथे रविवारी 1 वाजता तर जालना येथे सकाळी 4 वाजता पोहोचेल. ही गाडी औरंगाबाद, मनमाड, खंडवा, इटारसी, जबलपूर, प्रयागराज, वाराणसी मार्गे छपरा येथे पोहोचेल. या गाडीमुळे जालना, औरंगाबादकरांना उत्तर भारतात जाण्यासाठी थेट रेल्वे उपलब्धत झाली आहे.
त्यामुळे आता औरंगाबादकरांना वाढत्या गर्दीपासून सुटका आणि भारतासाठी मराठवाड्याहून थेट कनेक्टिव्हिटी मिळावी यासाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिवाळी भेट दिल्याचं बोललं जात आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.