Diwali Fire Crackers Saam Tv
महाराष्ट्र

सावधान! दिवाळीत फटाके फोडताय?, औरंगाबादेत १६ मुलांसोबत घडला भयावह प्रकार

दिवाळीत तुम्हीही जर फटाके फोडत असाल, तर वेळीच सावध होण्याची गरज आहे.

डॉ. माधव सावरगावे

Diwali 2022 Aurangabad News : सध्या देशासह राज्यभरात दिवाळीचा (Diwali) सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. घराची सजावट करण्यापासून, कपडे खरेदी करण्यापर्यंत आणि फराळ बनवण्यापासून रांगोळी काढण्यापर्यंत लोकांची सगळी लगबग दिसून येत आहे. बच्चे कंपनी सुद्धा फटाके वाजवून दिवाळीचा आनंद घेत आहे. अशातच औरंगाबादमध्ये फटाके फोडत असताना, अनेक मुलांसोबत भयावह प्रकार घडला असल्याचं उघडकीस आलंय.

दिवाळीत तुम्हीही जर फटाके (Firecrackers) फोडत असाल, तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण, औरंगाबादेत फटाके फोडताना आतापर्यंत तब्बल १६ मुलांच्या डोळ्याला आणि चेहऱ्याला गंभीर इजा झाली आहे. या मुलांवर शासकीय घाटी रुग्णालयामध्ये उपचार करून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. तर यातील एक १९ वर्षीय मुलाच्या डोळ्याला गंभीर इजा झालेली आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.

दिवाळीनिमित्त फटाके फोडताना आतापर्यंत शहरात जवळपास २० मुलांचे डोळे आणि चेहरा भाजले असल्याचं माहिती आहे. फटाके फोडताना सावधानता बाळगा, असं नेहमी सांगितल्या जातं मात्र तरीसुद्धा असे अपघात घडतात. दरम्यान फटाके फोडताना काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

तरुणांचा एकमेकांच्या अंगावर फटाके फेकण्याचा स्टंट

औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातल्या खामगांवमध्ये लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने फटाके फोडून एकमेकांवर फेकत असल्याचे समोर आल्यानं खळबळ उडाली. गावातील तरुणाचे तीन गट फटाक्यांची आतिषबाजी करीत एकमेकांवर पेटलेले फटाके एकमेकांवर फेकत होते. औरंगाबादच्या खामगांव येथे मुलांच्या तीन वेगवेगळ्या गटात तुफान 'फटाके बाजी' पाहायला मिळाली.

ज्यात ही मुलं फटाके एकमेकांच्या अंगावर फेकताना पाहायला मिळाली. यात कोणीही जखमी झाले नसले तरीही मोठा धोका टळला. याचा एक व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याबाबत गावकऱ्यांनी त्या तरुणांना समज दिली आहे. त्यासोबतच पोलिसांनी कोणती कारवाई करू नये, यानंतर हा प्रकार होणार नाही, याची काळजी घेणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लोणावळ्यात परदेशी नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश

Maharashtra News Live Update: दिल्ली पोलिसांच्या नोटिशीनंतर अभिजीत दिपके वकिलांशी चर्चा करणार

Bhuvneshwar Kumar: करो-या-मरो सामन्याआधीच अर्शदीप आऊट! भुवनेश्वरला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळणार का?

Veg Spring Roll Recipe: संध्याकाळच्या चहासोबत खाण्यासाठी बनवा क्रंची टेस्टी व्हेज स्प्रिंग रोल, वाचा रेसिपी

Bribe Case: बांधकाम विभागातील २ अधिकाऱ्यांना अटक, लाच घेताना रंगेहात पकडलं

SCROLL FOR NEXT