औरंगाबादची ओळख आता 'क्राईम कॅपिटल' होतेय?  Saam Tv
महाराष्ट्र

औरंगाबादची ओळख आता 'क्राईम कॅपिटल' होतेय?

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद: उद्योगनगरी आणि पर्यटन राजधानी म्हणून ओळख असलेल्या औरंगाबादची ओळख आता 'क्राईम कॅपिटल' (Crime Capital) होतेय की काय अशी भिती वाटत आहे. कारण भर दिवसा लूट, हल्ला आणि खून होत आहेत. त्यामुळे आता थेट गृहमंत्रीसाहेबांनीच औरंगाबादेत (Aurangabad) लक्ष घालावं अशी विनंती केली जात आहे.

गृहमंत्रीसाहेब (Home Minister), औरंगाबादमधली गुन्हेगारी आताच रोखा; नाहीतर आपल्या औरंगाबादची ओळख बिहारमधल्या औरंगाबादसारखी होईल. कारण औरंगाबाद शहरात भर दिवसात लूट-मारहाण, अत्याचारासोबतच क्रूरतेने भर रस्त्यात खून करणाऱ्या घटनांनी कळस गाठलाय. तर दुसरीकडे पोलीस आयुक्त बैठकीत आणि पोलीस अधिकारी गुन्हे घडल्यांनंतरच्या कारवाईत बिझी आहेत. अनेक व्हिडिओ पाहिल्यानंतर तुझ्या अंगाचा थरकाप उडतो.

८ ऑगस्टच्या सायंकाळी औरंगाबाद शहरातल्या सिडको परिसरातील न्यू हनुमान नगरमध्ये २१ वर्षाच्या आकाश राजपूतला निर्घृणपणे ठेचून मारण्यात आलं. भर रस्त्यात मस्तवालपणे लाकडी दांडके आणि धारदार शस्त्राने शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आली. त्यात एका निष्पापाचा बळी गेला. पण भर दिवसा, भर रस्त्यात गुन्हे करणाऱ्यांना पोलिसांचे कुठलेही भय राहिले नाही.

आता शहरातील नागरिकांचा संताप वाढला. अफगाणिस्तानात जशी तालिबानी आपली क्रूरता दाखवत आहेत, त्यापेक्षा भंयकर औरंगाबादमध्ये दिसतंय, त्यामुळे शहरात संतापाची लाट उसळत आहे. एकाच आठवड्यात दोन उद्योजकांवर हल्ला, पेट्रोल पंपावर भरदिवसा लूट आणि ही भर रस्त्यात अमानुष हत्या त्यासोबतच दररोज घडणाऱ्या चोरी लुटमारीच्या घटना दिवसेंदिवस वाढ वाढत आहेत. मग याला कोण जबाबदार असा प्रश्न औरंगाबादवासियांना पडला आहे.

जर हे असंच सुरू राहिलं तर उद्योगनगरी आणि पर्यटन राजधानीची ओळख पुसून 'क्राईम कॅपिटल' म्हणून ओळख व्हायला अधिक काळ लागणार नाही. त्यामुळे गृहमंत्रीसाहेब, पुढचा धोका आधीच ओळखून गुन्हेगारांचं भय संपवून टाकायला तुम्ही पुढाकार घ्या.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jitada Fish : चविष्ट 'जिताडा' समुद्रातून होतोय गायब, मच्छिमारांच्या हातीही लागेना; काय आहे कारण? पाहा व्हिडिओ

Maharashtra News Live Updates : वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी आंदोलक आमनेसामने, घटनास्थळी पोलीस तैनात

Maharastra Politics : साखरपट्टा महायुतीला कडू? शरद पवारांच्या डावाने सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढलं? वाचा सविस्तर

Maharashtra Politics: मविआची 80 टक्के जागावाटपावर चर्चा पूर्ण, विदर्भात तिढा कायम; VIDEO

Mumbai Senate Election : मोठी बातमी! मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित, कारण काय? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT