औरंगाबाद: आजपासून १० वीची परीक्षा (SSC Board) सुरु होत आहे. कोरोनामुळे २ वर्षांनंतर १० वीची ऑफलाईन परीक्षा सुरु होत आहे. याविषयी औरंगाबादमध्ये (Aurangabad) मोठ्या प्रमाणात खळबळ माजवणारी घटना घडली आहे. १० वीच्या परीक्षेचे हॉलतिकीट देण्यासाठी ३० हजार रुपये मागणाऱ्या एका संस्थाचालकाला पोलिसांनी (police) अटक (Arrested) करण्यात आली आहे. कलावतीदेवी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष एस. पी. जवळकर यांनी एका बहिःस्थ विद्यार्थ्यांकडे (students) ३० हजार रुपयांची मागणी केली आहे.
हॉलतिकीट देण्यासाठी आणि परीक्षेमध्ये मदत करण्यासाठी बहिःस्थ परीक्षार्थ्याकडे त्यांनी ३० हजार रुपये मागितल्यावर १० हजार रुपये स्वीकारताना त्यांना पोलिसांनी (police) अटक करण्यात आली आहे. शाळेत लिपिक सविता खामगावकर यादेखील लाचखोरीत सहभागी असल्याचे समजत आहे, त्यांच्याविरोधामध्ये देखील गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अगोदर कोरोनामुळे (corona) गेल्या २ वर्ष १० वीच्या परीक्षा ऑफलाईन झाले नाहीत. तब्बल २ वर्षांनी ऑफलाईन (Offline) परीक्षा होणार आहेत.
हे देखील पहा-
२ वर्ष कोरोनामुळे शाळा बंद, ऑनलाईन वर्ग यांमुळे विद्यार्थ्यांच्या मनात अगोदरच अनेक प्रश्न उभे आहेत. अशातच अशा प्रकारांमुळे विद्यार्थी आणि पालकांना मनस्थाप सहन करावा लागत आहे. दरम्यान, राज्यामध्ये आजपासून १० वी बोर्डाची परीक्षा सुरू होत आहे. कोरोनामुळे २ वर्षांनंतर १० वीची ऑफलाईन परीक्षा सुरु होणार आहे. १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थी १० वी बोर्डाची परीक्षा देणार आहेत. दरम्यान, १० वीच्या परीक्षार्थिंना वेळ वाढवून देण्यात आला आहे. १० वीच्या लेखी परीक्षेमध्ये ७० ते १०० गुणांच्या पेपरकरिता ३० मिनिटे तर ४० ते ६० गुणांच्या पेपरसाठी १५ मिनिटे वेळ वाढवून देण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या मार्च एप्रिल २०२२ च्या १० वी बोर्ड परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. गेल्यावर्षी कोरोनाच्या परिस्थितीत १० वी परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आली होती. यामुळे २ वर्षानंतर १० वी परीक्षा घेतली जात आहे. यंदाच्या १० वी बोर्ड परीक्षेला १६,१३,१७२ विद्यार्थी बसणार आहेत. १० वी बोर्ड परीक्षेकरिता एकूण २२,९११ शाळांमधील विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. राज्यात २१,२८४ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. आज पहिला पेपर हा प्रथम भाषेचा असणार आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.