New Delhi: गेल्या काही महिन्यांपासून औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांच्या नामकरणाचा मुद्दा चांगलाच तापला होता. याबद्दल आता महत्वाची माहिती समोर आली असून औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’,उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारने मंजुरी दिले आहे.
याबद्दलचे ट्विट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ज्यामध्ये त्यांनी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय मंत्री मा. अमित शाह (Amit Shah) यांचे आभार मानले आहेत.
औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला केंद्र सराकरने मंजुरी दिली आहे. यापुढे औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव असे असणार आहे. उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे फडणवीस यांनी आभार मानले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले’, असेही फडणवीस यांनी म्हटले.
याबद्दलचे ट्विट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ज्यामध्ये त्यांनी "औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’ ! राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी ! मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री मा. अमितभाई शाह यांचे कोटी-कोटी आभार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले," असे म्हणत याबद्दलची माहिती दिली आहे.
दरम्यान, 29 जून 2022 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र 4 जुलै 2022 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळाने महाविकास आघाडी सरकारने केलेल नामांतराचा ठराव रद्द केला. त्यानंतर 16 जुलै 2022 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर या प्रस्तावाला पुन्हा एकदा मंजुरी दिली. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.