Amol Khotkar Saam Tv
महाराष्ट्र

Amol Khotkar: संभाजीनगर दरोडा प्रकरण, एन्काऊंटरमध्ये मारल्या गेलेल्या अमोल खोतकरचा थरारक VIDEO

Amol Khotkar Video: संभाजीनगरमध्ये उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर मोठा दरोडा टाकण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी अमोल खोतकरचा एन्काऊंटर करण्यात आला होता. त्याचा एक जुना धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

Priya More

माधव सावरगावे, संभाजीनगर

संभाजीनगरमध्ये उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर दरोडा टाकणाऱ्या मुख्य आरोपीचा म्हणजे अमोल खोतकरचा पोलिसांनी एन्काऊंटर केला होता. पण अमोल खोतकर हा किती खतरनाक गुन्हेगार होता हे एका व्हिडिओतून समोर आले आहे. अमोल कोतकर हा आपल्या जवळ असले पिस्तुले साफ करतानाचा व्हिडिओ साम टीव्हीला पोलिसांकडून मिळाला आहे. पिस्तुले साफ करत असताना तो 'एक कोटी रुपये द्या किंवा सुपारी द्या, कोणालाही ठार करू शकतो.' असं बोलताना व्हिडीओमध्ये दिसत आहे.

अमोल खोतकर एकाच वेळेस तीन- तीन पिसूले वापरायचा. सोबतच हत्या करण्यासाठी किंवा गुन्हा करण्यासाठीची साधने त्याच्याजवळ होती. एक कोटी रुपयांत सुपारी घेतो आणि शंभर टक्के गॅरंटी असते, असं म्हणत या व्हिडिओमध्ये कुणीतरी अमोल कोतकरचे कौतुक करताना बोलत आहे. 'मर्डर ऑफ किंग', अशी त्याची ओळख करून देताना दिसत आहे.

उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर दरोडा प्रकरणात एन्काऊंटरमध्ये मारला गेलेल्या अमोल खोतकरची बहीण रोहिणी बाबूराव खोतकरला गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी रात्री अटक केली होती. तिच्याकडून पोलिसांनी सोन्याच्या दागिन्यांसह जिवंत काडतुसे जप्त केली होती. घरातील तुळशी वृंदावनाखालील जमिनीत तिने हातमोज्यामध्ये लपवलेले २२ तोळे सोन्याचे दागिने, ७ जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली.

संतोष लड्डा यांच्या बंगल्यात १५ मेच्या रात्री सहा दरोडेखोरांनी साडेपाच किलो सोने, ३२ किलो चांदी लुटली होती. या प्रकरणातगुन्हे शाखेने आतापर्यंत २१ आरोपींना अटक केली आहे. एपीआय रविकांत गच्चे यांनी २६ मे रोजी साजापूर रस्त्यावर अमोल खोतकरचे एन्काउंटर केले होते. या प्रकरणात आता पोलिसांनी अमोल खोतकरची बहीण रोहिणीला देखील अटक केली आहे. सुरूवातीला रोहिणी खोतकर भावाच्या एन्काऊंटर प्रकरणात पोलिसांवर गंभीर आरोप केले होते.

चौकशीत तिने पडेगाव येथील गॅरेजसमोर लावलेल्या कारच्या डिकीत चांदी लपवल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी ३१ किलो चांदी जप्त केली होती. अमोलची मैत्रीण खुशीने रोहिणीकडे सोन्याचे दागिने असल्याचा जबाब पोलिसांना दिला होता. खोतकरचा मित्र आणि आरोपी सुरेश गंगणे आणि रोहिणीच्या एका मैत्रिणीनेदेखील दागिने तिच्याकडेच असल्याचे सांगितले होते. त्यावरून पोलिसांनी रोहिणीला चौकशीसाठी बोलावले होते. ती १८ जून रोजी मोबाइल बंद करून गोव्याला निघून गेली. त्यांनतर तिच्या अटकेसाठी पोलिसांची पथके रवाना केली होती. तिथेच पोलिसांनी तिला अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Free chicken distribution in pune : ओळखपत्र दाखवा अन् चिकन मोफत न्या; जोडप्याने वाटलं 5000 किलो चिकन मोफत, VIDEO

Monday Horoscope : वरिष्ठांच्या नजरेत प्रतिमा उंचावेल, विष्णू उपासना फायदेशीर ठरणार; 'या' राशींच्या लोकांना प्रेमात लाभ होणार

Maharashtra Politics: ठाकरे बंधूंची युती कधी होणार? उद्धव ठाकरेंचा युतीबाबत नवा दावा?

Marathi Language Controversy: मुंबईत पुन्हा मराठी-हिंदी वाद उफाळला; परप्रांतीय महिलेचा मराठी बोलण्यास नकार, VIDEO

Couple Romance Viral video : आता याला काय म्हणावं? गर्लफ्रेंडने डोके मांडीवर ठेवले अन्...; उडत्या विमानात कपलचा रोमान्स, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT