Aurangabad Kidnapping News
Aurangabad Kidnapping News नवनीत कुमार तापडिया
महाराष्ट्र

Aurangabad Crime: पावणेचार कोटींसाठी सेवानिवृत्त अधिकाऱ्याचं अपहरण; पोलिसांनी ७ तासांत लावला छडा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवनीत कुमार तापडिया, औरंगाबाद

औरंगाबाद: एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे अपहरण (Kidnap) झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात घडली होती. अपहरणकर्त्यांनी काल, शनिवारी एमआयडीसीच्या एका सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्याचे अपहरण केले होते. याप्रकरणी औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी केली आहे. औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी अगदी सात तासांमध्ये या अपहरणाचा छडा लावला आणि अपहरण झालेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याची सुटका करुन सिनेस्टाईलने गुन्हेगारांना अटक केली आहे. (Aurangabad Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद- जालना महामार्गावरील छत्रपती संभाजी साखर कारखान्या जवळील इब्राहिमपूर शिवारातून या सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे अपहरण करण्यात आले होते. विश्वनाथ लक्ष्मण राजाळे असे अपहरण झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. 3 कोटी 80 लाख रुपयांच्या खंडणीसाठी त्यांचे अपहरण केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. या अपहरणकर्त्यांनी काल, शनिवारी दुपारी चाकूचा धाक दाखवून राजाळे यांचे अपहरण करण्यात आले होते. या घटनेची माहीती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि अवघ्या सात तासांत या प्रकरणाचा छडा लावला.

औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी जालना जिल्ह्यातील बदनापूरजवळून या अधिकाऱ्याची सिनेस्टाईल सुटका केली. या अपहरणाचा मास्टरमाईंड हा अपहरण झालेल्या अधिकाऱ्याचा सालगडी आणि त्याचा मुलगा असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shirdi News: अवघ्या एका रुपयात लग्न.. शिर्डीतील कोते दाम्पंत्याचा आदर्श उपक्रम; २४ वर्षात केले २३०० मुलींचे कन्यादान

Shukrawar Upay: शुक्रवारी महिलांनी करू नका ही कामे, माता लक्ष्मी होईल नाराज

Abijeet Patil News | अभिजीत पाटील यांच्या साखर कारखान्यावरची जप्ती टळली, नुकताच केला होता भाजपमध्ये प्रवेश

Yawal Fire News : प्राचीन श्रीराम मंदिरासह बँकेला आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज

Sony AC : रखरखत्या उन्हात रस्त्यावरून जातानाही मिळणार एसीची हवा; कसं? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT