Aurangabad Khultabad Crime News Saam Tv
महाराष्ट्र

जावयाला पुरणपोळी बनवून न दिल्याने राग अनावर; सासूने सुनेच्या डोक्यात मारली पकड!

याप्रकरणी सासूवर खुलताबाद पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

डॉ. माधव सावरगावे

खुलताबाद : सासुरवाडीला आल्यावर जावयाचा वेगळाच थाट असतो. जावई आला म्हटलं तर सासुरवाडीची मंडळी त्याला आवडेल ते जेवण बनवतात, मानपान देतात. अशातच जावयाचा थाट पूर्ण न केल्याने सासूने चक्क सुनेच्या डोक्यात पकड मारल्याची घटना उघडकीस आली. औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील खुलताबाद (Khultabad) तालुक्यातून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. (Aurangabad Crime News)

जावई सासरी आल्यानंतर सुनेनं त्याला पुरणपोळी बनवली नाही म्हणून संतापलेल्या सासूने सुनेच्या डोक्यात पकडीने वार केला. या घटनेत सून गंभीर जखमी झाली. माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीची बाजारसावंगी ही सासूरवाडी आहे. काही कामानिमित्त तो सासूरवाडीला आला होता. बऱ्याच दिवसांनी जावई घरी आल्यानंतर सासूलाही आनंद झाला. तिने आपल्या सूनेला जावयासाठी पुरणपोळी बनवण्यास सांगितलं.

मात्र, सूनेनं पुरणपोळी बनवून देण्यास नकार दिला. मग काय याच गोष्टीवर सासूला राग अनावर झाला. आणि तिने थेट किचनमध्ये प्रवेश करत सूनेच्या डोक्यात पकडीने वार केला. या घटनेत सून गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याप्रकरणी सासूवर खुलताबाद पोलिंसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पवारांसोबतच्या बैठकीनंतर पार्थ पवारांचा सुनेत्रा पवारांना फोन

Herbal Tea : दुधाचा वापर न करता बनवा 'या' ५ प्रकारच्या हर्बल टी

Ardh Kendra Yog: 165 वर्षांनंतर या राशी छप्परफाड धन कमावणार; अर्धकेंद्र योगाने होणार भरभराट

गर्दीत लोकल पकडताना होत्याचं नव्हतं, धावत्या Local खाली महिला सापडली अन्...

Lunch And Dinner Time: दुपार आणि संध्याकाळच्या जेवणाची योग्य वेळ कोणती?

SCROLL FOR NEXT