Aurangabad Corona Updates, Aurangabad Latest Marathi News Saam Tv
महाराष्ट्र

औरंगाबादकरांनो काळजी घ्या! शहरात ४ दिवसांत १५ जणांना कोरोनाची लागण

आठवडाभरापासून शहरात सभा तसेच मोठमोठे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे. अशातच औरंगाबाद जिल्ह्यातून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. औरंगाबाद शहरात गेल्या 4 दिवसांत कोरोनाचे तब्बल 15 रुग्ण आढळून आले आहेत. शून्य रुग्ण संख्या असलेल्या औरंगाबादेत रुग्णांची संख्या वाढत असल्यानं महापालिकेच्या यंत्रणेसमोरील चिंता वाढली आहे. (Aurangabad Corona Latest News)

आठवडाभरापासून शहरात सभा तसेच मोठमोठे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे पुन्हा शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता जास्तीत जास्त कोरोना चाचण्या होण्यासाठी पालिकेने चाचणी केंद्रांची संख्या वाढवली आहे. त्यासाठी शहरात 9 ठिकाणी चाचणी केंद्र सुरू करण्यात आलेत. 4 जून रोजी एकही कोरोनाबाधित नसताना 5 जून रोजी शहरात दोन रुग्ण आढळले, यानंतर महापालिका प्रशासनाने तपासणी केंद्रामध्ये वाढ केली.

दरम्यान, शहरात 6 जूनला 5 रुग्ण, तर 8 जून रोजी ४ आणि 9 जून रोजी 4 रुग्ण आढळून आले. शहरात कोरोनाबाधित व्यक्ती आढळून येण्याचे प्रमाण शून्य झाले होते, पण आता काही दिवसांपासून बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे आरोग्य विभागाने कोरोना चाचणी केंद्रांत वाढ करून 9 ठिकाणी नवीन केंद्र सुरू केली आहेत.

यामध्ये छावणी आरोग्य केंद्र, सिडको एन-११ आरोग्य केंद्र, सिडको एन-८ आरोग्य केंद्र, कैसर कॉलनी दवाखाना, घाटी रुग्णालयाची मेडिसीन विभागाची इमारत, सिडको एन-२ कम्युनिटी सेंटर, पदमपुरा कोविड केअर सेंटर, मेल्ट्रॉन हॉस्पिटल, विमानतळ या ठिकाणी नव्याने कोरोना चाचणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Char Dham Yatra 2026: चारधाम यात्रेला जाताय? 'हे' सर्टिफिकेट नसेल तर मिळणार नाही दर्शन, काय आहे नियम?

Maharashtra News Live Update: घायल हूँ, इसलिए घातक हूँ"..! ईडीच्या फेऱ्यातून कोर्टाने सुटका झाल्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया

Post Office Scheme : ₹१००० गुंतवा अन् महिन्याला मिळवा २०, हजार व्याज; पोस्टाच्या या योजनेत व्हाल मालामाल

भाजपच्या मोर्चावर ताईंनी बाटली फेकून मारली; 'त्या' घटनेवर मंत्री गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया

Actor House Burgled: प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी चोरी; मोलकरणीने लंपास केले लाखोंचे दागिने आणि रोकड

SCROLL FOR NEXT